Water Scarcity Photo Agrowon
ॲग्रो विशेष

World Water Forum Conference : जागतिक जलमंच परिषदेमध्ये विविध समस्यांवर चर्चा

Discussion on Water Crisis : प्रत्येक जलमंचाच्या बैठकीसाठी एक निश्‍चित विषय निर्धारित करण्यात येतो. त्या विषयावर आधारित चर्चा होते. जागतिक जलपरिषद आणि इंडोनेशियन सरकारच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

Discussion on various issues in the World Water Forum Conference : प्रत्येक जलमंचाच्या बैठकीसाठी एक निश्‍चित विषय निर्धारित करण्यात येतो. त्या विषयावर आधारित चर्चा होते. जागतिक जलपरिषद आणि इंडोनेशियन सरकारच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक जल परिषदेचा एक पार्लमेंटरी विभाग आहे, यामध्ये सर्व देशांचे सदस्य राष्ट्रांचे प्रमुख एकत्र येतात आणि यामध्ये दिशानिर्देश ठरतो. मंत्री परिषदेवरील घटनेमध्ये मुख्य सरकारची जी रचना आहे त्यांचे विचार ऐकले जातात. देशाच्या जल संकटावर मात करण्यासाठी धोरणात्मक काय निर्णय घ्यावेत याबाबत चर्चा होते.

सर्वसाधारणपणे या जागतिक जलमंचामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांमध्ये भूमध्य सागराच्या प्रदेशात असणारे देश, अमेरिका खंड, आशिया खंड आणि प्रशांत महासागराच्या प्रदेशात असलेले देश आणि आफ्रिका खंडातील देश अशी सर्वसाधारणपणे विभागीय वर्गवारी करण्यात आली आहे. जागतिक जल परिषद ही जगभरातील जल संकटावर चर्चा, विचारमंथन आणि त्यावर निश्‍चित मार्ग काय काढावे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत असते. ही जगातील पाण्यावर काम करणारी सगळ्यात मोठी परिषद आहे.

सर्वसाधारणपणे मागील तीन दिवसांमधील चर्चेमध्ये जगातील सर्वांत खंडांमध्ये विशिष्ट भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये असणारे देश, आफ्रिका खंडातील देश, अमेरिकेतील देश या सर्व देशांना पाण्याची खूप मोठी अडचण भासते आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध पाणी आणि पाण्याची मागणी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे, हे सर्व देशातील प्रतिनिधींनी सांगितलेले आहे.

दक्षिण पूर्व आशिया म्हणजेच भारतीय उपखंडाच्या पूर्वेला असलेली आशिया खंडातील देश आहेत. ज्यामध्ये विशेषतः कंबोडिया, व्हिएतनाम, लावोस, इंडोनेशिया, थायलंड, जावा, सुमात्रा ही बेटे येतात. यांचे प्रश्‍न अधिक गंभीर आणि तीव्र आहेत. कारण हे सर्व देश प्रशांत महासागर आणि भूमध्यसागर यांच्या परिघांमध्ये येतात. वादळ, सुनामी, पूर यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागते. तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही अत्यंत गंभीर आहेत. हे देशात भात हे प्रमुख पीक आहे. या देशातील लोकांच्या आहारामध्ये भात हा प्रमुख घटक असतो. त्याशिवाय मासे आणि मांसाहार हे दोन त्यांचे प्रमुख खाद्यपदार्थ आहेत. पाण्याच्या संकटामुळे भात उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण सर्वांत अधिक पाणी हे भात पिकासाठी लागते. इतर देशांप्रमाणे याही ठिकाणी लोकसंख्येची मोठी वाढ झालेली आहे. विशेषतः इंडोनेशिया हा जगातील सर्वांत जास्त घनता असलेला देश आहे.

दक्षिण आशिया उपखंडामध्ये भारत, पाकिस्तान, म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेशातील पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत गरजेचे आहे. तथापि, यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप महत्त्वाची गरज आहे. पाण्याचा वापर वाढल्यामुळे भूगर्भातून पाण्याचा प्रचंड उपसा झाला आहे. तसेच जलप्रदूषणातही वाढ झाली आहे. लोकसहभागाच्या बरोबरीने लोकशिक्षण महत्त्वाचे आहे, तथापि राजकीय इच्छाशक्ती, कायद्यामधील बदल, धोरणातील बदल, नदी नीती इत्यादी बाबी प्रत्येक देशाने स्पष्टपणे अधोरेखित केल्या पाहिजेत. त्यासाठीच ही जागतिक जलपरिषद आहे.

येता काळ हा संगणकीय काळ आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमता आणि डेटा सायन्स या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. यामध्ये संपूर्ण जलचक्रामधील पाण्याची उपलब्धतेची गणना करता येते. भारतामध्ये पूर आणि दुष्काळ या दोन मोठ्या समस्या आहेत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे या समस्यांच्या आधारे पूर्वअनुमान करणे शक्य आहे.

जागतिक जल परिषदेमध्ये उभारण्यात आलेल्या दालनामध्ये जगभरातील विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये विशेषतः पाण्यावर काम करणाऱ्या संस्था आणि कंपन्यांनी पाणी शुद्ध करण्याची उत्पादने मांडली आहेत.

निसर्गसंपन्न बाली बेट

बाली हे इंडोनेशियातील एक स्वतंत्र बेट म्हणून अस्तित्वात आहे. या बेटाला स्वतःची प्रशासकीय रचना आणि अधिकार आहे. येथे राज्यपाल हा प्रशासकीय प्रमुख असतो. अध्यक्ष आणि पूर्ण मंत्री परिषद अशी त्याची रचना आहे. त्याशिवाय प्रत्येक भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांचे स्वतंत्र नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन स्थानिक स्तरावर होते. या देशाची लोकसंख्या भरपूर आहे. चौल राजवंशाच्या काळामध्ये भारत आणि संपूर्ण दक्षिण पूर्व आशियामधील सगळ्या देशांशी व्यापार होता.

आज बाली बेटावर साधारणपणे ८० टक्के हिंदू आहेत उर्वरित ख्रिश्चन, बौद्ध आदी समाज आहे. येथील मॉन्सूनचा कालावधी साधारणपणे ऑक्टोबर ते जानेवारी असा असतो. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. येथे सुप्त स्वरूपातील ज्वालामुखी आहे. येथील जमीन सुपीक आहे. पर्वतराजींमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. उतारावर असलेल्या शेतीमध्ये भाताची मोठ्या प्रमाणात लागवड होते. येथील लोकांच्या आहारामध्ये भात, पालेभाज्या आणि माशांचा समावेश असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT