KDCC Bank Raju Shetti agrowon
ॲग्रो विशेष

KDCC Bank Raju Shetti : राजू शेट्टींनी मागवलेल्या माहितीचा जिल्हा बँकेकडून खुलासा, अकरा कारखान्यांची माहिती समोर

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारताच ते म्हणाले की, ही माहिती रात्री उशिरा मिळाल्याने त्याचा अभ्यास केलेला नाही.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane News : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना साखर कारखाने कर्जात आहेत तुम्ही मागणी केलेला दर कारखानदारांना देणे परवडत नसल्याचे म्हणत जिल्हा बँकेत तुमचा सीए पाठवून द्या आम्ही हिशोब सांगतो असे मुश्रीफ म्हणाले होते. यावर स्वाभिमानीकडून पत्र पाठवून माहिती मागवण्यात आली होती. याबाबत कोल्हापूर जिल्हा बँकेने स्वाभिमानीच्या पत्राला उत्तर दिले आहे.

जिल्हा बँकेने दिलेल्या पत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या बारा महिन्यांत सरासरी ३३२३ रुपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांना विचारताच ते म्हणाले की, ही माहिती रात्री उशिरा मिळाल्याने त्याचा अभ्यास केलेला नाही. आज, शुक्रवारी बँकेने कारखानानिहाय दिलेली आणि वार्षिक अहवालात दिलेल्या साखर विक्रीचा आणि शिल्लक साखरेचा तुलनात्मक अभ्यास करून आम्ही त्याचे उत्तर देऊ असे स्पष्ट करण्यात आले.

कारखानदार खुल्या बाजारात चढ्या दराने साखरेची विक्री करीत आहेत. मात्र आरएसएफच्या सूत्रानुसार ऊस उत्पादकांना ४०० रुपये द्यावे लागतात, म्हणून कमी दराने साखरेची विक्री केल्याचे दाखवत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. यावर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत सीए पाठवून द्या माहिती देतो असे उत्तर दिले होते.

म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला पत्र देऊन प्रत्येक महिन्याला केलेल्या साखर विक्रीची आणि दराची माहिती द्यावी, अशी मागणी बुधवारी केली होती. यानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेट्टी यांना ११ कारखान्यांची माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळव्याचा हुतात्मा वगळता इतर १० कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार सरासरी ३३२३ रूपये प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती देऊन खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असा साखरेचा भाव आहे, असा संघटनेचा दावा बँकेने खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे यावर संघटना पुढील भूमिका काय स्पष्ट करणार यासंबंधी उत्सुकता आहे.

बिद्री, अथणी शुगर्स शाहूवाडी, हुतात्मा वाळवा, सांगली जिल्हा, आजरा, अथणी शुगर्स तांबाळे, छत्रपती राजाराम, भोगावती साखर कारखाना, सदाशिवराव मंडलिक, संताजी घोरपडे, इको केन म्हाळुंगे, कुंभी कासारी या कारखान्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT