Warna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dam : वारणा धरणातून विसर्ग सुरू

Rain Alert : सांगली जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. शिराळा तालुक्यात रविवारी (ता. २५) मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. शिराळा तालुक्यात रविवारी (ता. २५) मुसळधार पावसाने हजेरी लावली.वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरणाच्या वक्र द्वारमधून १००० क्युसेक व विद्युत जनित्रमधून १४६५ क्युसेक असा एकूण २४६५ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडला असल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव या तालुक्यांसह अन्य तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली.

वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून विद्युत गृहातून चालू असलेल्या १४६५ क्युसेक विसर्गात वाढ केली आहे. दरम्यान वक्र द्वारमधून १००० क्युसेक व विद्युत जनित्रमधून १४६५ क्युसेक असा एकूण २४६५ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.

त्यामुळे नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सोमवारअखेर ३३१५ मिमी पाऊस झाला.

जिल्ह्यात सोमवारी (ता. २६) दिवसभर हलका पाऊस सुरू होता. तर शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस ः मिरजमध्ये १४.७ मिलिमीटर, जत ४.१, खानापूर १०.५, वाळवा २३, तासगाव ८, शिराळा ४५.८, आटपाडी १.५, कवठे महांकाळ १२.४, पलूस १२, कडेगावमध्ये २१ मिमी पावसाची नोंद झाली.

२१ वेळा अतिवृष्टी

चांदोली परिसरात जुलैमध्ये १७ वेळा, तर चरण येथे ११ आणि ऑगस्टमध्ये चांदोलीत चार, तर चरण येथे १ अशी दोन महिन्यांत चांदोलीत २१ व चरण येथे १२ वेळा अतिवृष्टी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT