Chetan Narake Agrowon
ॲग्रो विशेष

Chetan Narake : १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीज बिल माफ करा; नरके यांची सरकारकडे मागणी

Dhananjay Munde : राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसह महिलावर्गाला खूश करणाऱ्या घोषणा केल्या. यात वीज बिल माफीचा निर्णय घेण्यात आला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारने अगामी विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला. पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. तर हा निर्णय एक ते साडेसात हॉर्स पावरच्या कृषी पंपांसाठी घेण्यात आला. यानंतर कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके यांनी १५ अश्वशक्तीच्या कृषी पंपाचे वीज बील माफ करावे, अशी मागणी केली आहे. याबाबतीत नरके यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पत्र पाठवले आहे.

नरके यांनी मुंडे यांना पाठवलेल्या पत्रात, पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे थकीत वीज बील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार एक ते साडेसात अश्वशक्तीच्या कृषी पंपांचे कृषी वीज बिल माफ करण्यात येणार आहे. मात्र सरकारला दुर्गम डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील दुर्गम डोंगराळ भागात शेतकरी शेती करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी डोंगराळ भागात ऊस शेती करतो. तर या शेतीला उंचावर पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी जादा अश्वशक्तीच्या कृषी पंपांचा वापर करावा लागतो. जे साडेसात अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचे आहेत. त्यामुळे सरकारने १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे वीज बील माफ करून दुर्गम डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे कृषी मंत्री मुंडे यांच्याकडे केली आहे.

याआधी देखील नरके यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीवरून दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी केली होती. नरके यांनी विखे पाटील यांची भेट घेऊन सरकारने दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी कडक कायदा व धोरण राबवावे अशी मागणी केली होती. दरम्यान पावसाळी अधिवेशनात मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी देखील शेतकऱ्यांच्या १० ते १५ अश्वशक्तीच्या विद्युत पंपाची थकीत वीज बिले माफ करावीत, अशी मागणी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT