Agriculture State Award : शेतीत सर्वश्रेष्ठ महाराष्ट्रच! मुख्यमंत्री शिंदे सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार स्वीकारणार

Best Agriculture State Award : यंदाचा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. तो जुलैला नवी दिल्लीत दिला जाणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार आहेत.
Agriculture State Award
Agriculture State AwardAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राला यंदाचा देशातील कृषी नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० जुलै रोजी नवी दिल्लीत या पुरस्काराचा स्वीकारणार आहेत. याआधी २०२३ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहारला आणि २०२२मध्ये उत्तर प्रदेश राज्याला देण्यात आला होता. त्यानंतर आता १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने मराहाराष्ट्राची निवड केली आहे. तर नाविन्यपूर्ण शेतकरी धोरणं, शेती संदर्भात सरकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी आणि ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या योजनांबद्दल हा पुरस्कार राज्याला मिळत आहे.

कृषी नेतृत्व पुरस्कार २०२४ हा नवी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे येथे भव्य समारंभात दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासह कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्य कृषी मंत्री, ब्राझील, अल्जीरेया, नेदरलँड देशाचे राजदूत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यासह, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड राज्यातील मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

Agriculture State Award
Eknath Shinde : शेतकऱ्यांशिवाय देशाचा उत्कर्ष अशक्य

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आले आहे. जे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन आहे. तसेच शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात १.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे १२३ मेगा सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा निधी दुपट्ट करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. तसेच नॅनो तंत्रज्ञानद्वारे खतांचे वितरण आणि सर्वसमावेशक सुक्ष्म-बाजरी कार्यक्रम देखील सुरू करण्यात आला आहे.

Agriculture State Award
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनाला २४ तास होण्याआधीच इंद्रायणी पुन्हा फेसाळली

तर शिंदे सरकारच्या या विविध योजना आणि धोरणांचा लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांवर सकारात्मक परिमाण दिसत असून ग्रामीण समृद्धीला चालना मिळाल्याचे पुरस्कार समितीचे म्हणणे आहे. तसेच राज्यातील ४.३ लाख शेतकऱ्यांना नॅनो तंत्रज्ञानद्वारे मदत केल्याचेही पुरस्कार समितीने म्हटले आहे.

२००८ ला डॉ. एमएस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समिती या पुरस्कारासाठी गठीत करण्यात आली. यावेळी पहिला पुरस्कार आंध्रप्रदेशला देण्यात आला होता. त्यानंतर २०२३ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देऊन बिहारचा आणि २०२२मध्ये उत्तर प्रदेशचा गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com