Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement Center : हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने सोयाबीन उत्पादकांची अडचण

Soybean Procurement : केंद्र शासनाच्या वतीने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी घोषणा झाली मात्र, केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम आहे.

Team Agrowon

Buldana News : केंद्र शासनाच्या वतीने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी घोषणा झाली मात्र, केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अडचण कायम आहे. यंदाच्या हंगामासाठी केंद्राने सोयाबीनला ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. बाजारात यापेक्षा कमी दराने सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

शेतकऱ्यांना यंदा पावसाची अपेक्षित साथ मिळाली. त्यामुळे हे पीक चांगले येणार अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, परतीच्या व मॉन्सूनोत्तर पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले. सध्या शेतकऱ्यांना पैशांची अडचण भासत असल्याने बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यंदा केंद्र सरकारने सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल निश्चित करून राज्यात ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत.

दरम्यान व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची प्रत बघून ३ हजारांपासून ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे. शेतकऱ्यांना कात्रीत पकडून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे पाहवयास मिळते आहे.

केंद्र सरकारने या पिकाला किमान हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यास मान्यता दिली. किमान हमीभावापेक्षा कोणीही कमी दराने सोयाबीन खरेदी करू नये, असा कायदा केला आहे.

परंतु शेतकऱ्याने सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीला आणले तर सरकारी हमीभाव केंद्रे सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आज बाजारपेठेत सोयाबीनला तीन हजारांपासून चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलचा भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

वर्षनिहाय सोयाबीनचे हमीभाव

वर्ष हमीभाव

२०१७ तीन हजार ५०

२०१८ तीन हजार ३९९

२०१९ तीन हजार ७१०

२०२० तीन हजार ८८०

२०२१ तीन हजार ९५०

२०२२ चार हजार ३००

२०२३ चार हजार ६००

२०२४ चार हजार ८९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT