Soybean Procurement : बारामती बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू

Soybean Market : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे.
Soybean Procurement Process
Soybean Procurement ProcessAgrowon
Published on
Updated on

Pune News : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी आत्तापर्यंत सुमारे २१० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून आत्तापर्यंत १५ ऑक्टोबरपासून ४२ शेतकऱ्यांचा सुमारे ३७७ क्विंटल मालाची खरेदी झाली आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना माल विक्री करावयाचा आहे, त्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीच्या सूत्रांनी केले आहे.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमीदर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव ९ सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे.

त्याकरिता एक नोव्हेंबरपासून शेतकरी नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून येथील केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीन प्रति क्विंटल ४८९२ रुपये या हमीदराने शासन खरेदी करत आहे. त्यानुसार शेतमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम १८ लाख ४४ हजार २८४ रुपये बॅँक खात्यावर वर्ग केली आहे.

Soybean Procurement Process
Soybean Market : आर्द्रतेचा हमीभावाने सोयाबीन खरेदीत खोडा

सध्या सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे बाजार आवारात नवीन शेतमालाची आवक सुरू झाली आहे. बाजार आवारात मागणी व पुरवठा यानुसार दर निघतात. वाळलेला व स्वच्छ सर्वसाधारण दर्जाचा माल हमीदराने विक्रीची सोय करावी म्हणून बाजार समितीने शासनाकडे मागणी केली होती. हे केंद्र सुरू झाले असल्याने शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन बारामती बाजार समितीकडून करण्यात येत आहे.

या केंद्रावर शेतकऱ्यांनी नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची असल्याने नावनोंदणी करण्यासाठी प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांनी जो शेतमाल विक्री करावयाचा आहे. त्यासाठी संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना शासनाचे निकष प्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा. त्यासाठी प्रशांत मदने ८८८८८६७९२५ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले.

Soybean Procurement Process
Soybean Market : एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची आर्द्रता बारा टक्के असावी

सोयाबीन नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक :

- सोयाबीन नोंद असलेला सन २०२४-२५ पीकपेरा सहीत सातबारा उतारा,

- आठ-अ,

- आधारकार्ड

- आयएफएससी कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स व मोबाईल नंबर.

ऑनलाइन नोंदणीसाठी येथे संपर्क करावा :

शासनाने दिलेल्या कालावधीनुसार अजूनही शेतकऱ्यांनी बारामतीतील तीन हत्ती चौकातील बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघ येथे नावनोंदणी करावयाची आहे. बारामती मुख्य यार्ड येथे प्रत्यक्ष खरेदी केंद्र ऑनलाइन नावनोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना एसएमएस आल्यानंतर शेतीमाल समितीचे यांत्रिक चाळणी येथे शेतमाल घेऊन यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com