Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation : धाराशिवकर रचणार आज वृक्ष लागवडीचा इतिहास

Environment Conservation : राष्ट्रीय वननितीनुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन किंवा वनाच्छादित असण्याची गरज आहे. या क्षेत्राबाबत धाराशिव जिल्ह्याचा राज्यात शेवटचा क्रमांक लागतो.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात वनक्षेत्राचे प्रमाण वाढावे, जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा व्यापक प्रमाणात वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यातूनच शनिवारी (ता. १९) जिल्ह्यातील २९४ ठिकाण पाच हजार ७०२ हेक्टरवर विविध देशी पंधरा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करुन धाराशिवकर इतिहास घडवण्यासोबत विश्‍वविक्रमही करणार आहेत. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत धाराशिवकरांचे कौतुक केले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही यानिमित्ताने एकत्र येणार आहेत.

राष्ट्रीय वननितीनुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन किंवा वनाच्छादित असण्याची गरज आहे. या क्षेत्राबाबत धाराशिव जिल्ह्याचा राज्यात शेवटचा क्रमांक लागतो. वर्षानुवर्षाची ही स्थिती बदलण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुढाकार घेत यंदा पन्नास लाख वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे. यातूनच एकाच दिवशी पंधरा लाख वृक्ष लागवडीचा विश्‍वविक्रमही करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

यासाठी काही महिन्यांपासून ते जय्यत तयारी करत आहेत. त्यासाठी नोडल अधिकारी व पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन पाहायला मिळत आहे. या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असून प्रत्येकांनी ते झाड आपले आहे या भावनेने कुटुंबासह येऊन सहभागी होत नागरिक वृक्षारोपण करणार आहेत. एक पेड माँ के नाम व हरित धाराशिव अभियानातून हा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

रोपण केलेल्या वृक्षासोबत आपल्या आईसह कुटुंबासमवेत सेल्फी काढणे आवश्यक आहे. लावलेले वृक्ष ही सरकारी मोहीम न समजता स्वतःच आपल्या व भावी पिढीच्या फायद्यासाठी त्याची कशी जपवणूक होईल याची काळजी घ्यावी.

त्यासाठी हरित धाराशिव महोत्सव म्हणजेच वृक्ष लागवड हा सृष्टीचा सोहळा साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. दरम्यान, या मोहिमेच्या विश्‍वविक्रमाच्या नोंदणीसाठीही संबंधित संस्थेकडून परीक्षण करण्यात येणार आहे.

वृक्षांना क्यूआर कोड बसविण्यात येणार असून ही वृक्ष लागवड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्वांना दिसणार आहे. दहा गुंठे क्षेत्रासाठी दहा वृक्षमित्रांची नियुक्त करण्यात आली आहे. वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांवर देण्यात आली आहे. मोहिमेची जनजागृती करण्यात आली असून, यानिमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील नागरिक पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी करणार आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशींची प्रमुख उपस्थिती

लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या हरित धाराशिव अभियानाचे उद्‍घाटन सकाळी साडेदहा वाजता शिंगोली (ता. धाराशिव) येथील राखीव वनामध्ये परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, कैलास घाडगे पाटील, प्रा. डॉ. तानाजी सावंत व प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती, तर अभिनेता स्वप्नील जोशी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी व्ही. के. करे व विभागीय वन अधिकारी बी. ए. पोळ यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Viral Video : राज्यातील शेतकऱ्यांनो, विसरा हमी, खेळा रमी

Onion Procurement Scam : कांदा खरेदी केंद्रांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारची दक्षता समिती

Urea Shortage : युरियाची खानदेशात टंचाई

Maharashtra Assembly Session : बोजाखाली दबलेल्या सरकारची सुटका

MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

SCROLL FOR NEXT