Dhamani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dhamani Dam Level : धामणी धरणात ७१ टक्के पाणीसाठा

Dam Water Storage : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असणारे धामणी धरण बुधवारी (ता. २) तब्बल ७०.८७ टक्के भरले आहे. धामणी धरणातून सध्या ६५० क्युसिक पाणी विद्युतनिर्मितीसाठी सोडण्यात येते.

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे जलस्रोत असणारे धामणी धरण बुधवारी (ता. २) तब्बल ७०.८७ टक्के भरले आहे. धामणी धरणातून सध्या ६५० क्युसिक पाणी विद्युतनिर्मितीसाठी सोडण्यात येते.

विशेष म्हणजे, मागील वर्षी २ जुलै रोजी धामणी धरणात केवळ २०.९७ टक्केच पाणीसाठा होता. मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठले जात आहे. यामुळे शेतकरीवर्गासह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सद्य:स्थितीत धामणी धरणाची पाणीपातळी ११२.७५ मीटरवर पोहोचली असून, सुमारे १९५.८४४ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, कवडास-उन्हेयी धरणात ४४.७७ टक्के पाणी साठवणूक झाली असून, गेल्या वर्षी याच दिवशी या धरणात ६५.५० टक्के पाणी होते.

धामणी धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास शाखा अभियंता प्रवीण भुसारे यांनी व्यक्त केला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि वीजनिर्मितीच्या गरजा सुरळीत भागवता येणार आहेत. कवडास उन्नेयी बंधारा ४४ टक्के भरले असून, वांद्री मध्यम प्रकल्पामध्ये २५ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस!

वाणगाव : पालघर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने भात बियाण्यांची उगवण क्षमता चांगली झाली असून, रोपे जोमदार अवस्थेमध्ये आहेत. भात रोपे ही १५ ते २० दिवसांची झाली आहेत. पुढील आठ ते दहा दिवसांत लावणीयोग्य रोपे होतील. माॅन्सून हंगामातील सुरुवातीच्या जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

जूनच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस होत आहे. त्यामुळे एकूण ५७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तलासरी तालुक्यात सर्वाधिक ७४७.८ मिमी, तर मोखाड्यामध्ये सर्वात कमी ४३०.६ मिमी पाऊस झाला. २०२४ मध्ये जूनमध्ये ३६७.१ मिमी पाऊस झाला होता. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४११.९ मिलिमीटर पाऊस होतो. त्या तुलनेत यावर्षी ५७५ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा अधिक १३९.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जयसागर धरण जूनमध्येच तुडुंब

जव्हार : पावसाळ्यात जुलैच्या अखेरीस तुडुंब भरणारे जव्हारचे जयसागर जलाशय हे यंदा जूनमध्येच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. या धरणाची सहा मीटर उंची मागील वर्षी वाढविण्याचे काम पूर्ण झाले होते.

उंची वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ दिसून येत आहे. धरण क्षेत्रातील कोरडी जमीनही पाण्याखाली गेली आहे. जयसागर जलाशय भरल्याने वर्षभराची चिंता दूर झाली आहे. जव्हार नगर परिषद क्षेत्र, कासटवाडी आणि रायतळे ग्रामपंचायतींचा काही भाग धरण क्षेत्रात येतो.

जूनमधील पाऊस

तालुका पाऊस (मिमी) टक्केवारी

वसई ५१९ ८८

वाडा ५७० १२५

डहाणू ६६० १४९

पालघर ५७३ ११४

जव्हार ५३६ १२५

मोखाडा ४३४ ११९

तलासरी ७४७ १९१

विक्रमगड ५५७ ११०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT