Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : धामणी खोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

Water Crisis : गेल्या महिनाभरापासून कडक उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. दरवर्षीपेक्षा या वेळी परिसरात ऊसतोडणी हंगाम लवकरच संपला.

Team Agrowon

Kolhapur News : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील मातीच्या बंधाऱ्यात अडविलेले पाणी संपल्याने धामणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील सुमारे २५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, तीव्र पाणीटंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गगनबावडा, राधानगरी व पन्हाळा या तीन तालुक्यांतील सुमारे ४० गावांना धामणी नदीतून पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पिकांना जीवदान मिळावे यासाठी हिवाळ्यातच लोकवर्गणी व श्रमदानातून शेतकरी मातीचे बंधारे बांधून धामणी नदीत पाणी अडवितात.

गेल्या महिनाभरापासून कडक उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. दरवर्षीपेक्षा या वेळी परिसरात ऊसतोडणी हंगाम लवकरच संपला. त्यामुळे ऊस शेतीसाठी पाणीउपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. पश्चिमेकडील नदी उगमाकडील परिसरात थोडेफार पाणी आहे.

कडवेपासून म्हासुर्ली दरम्यानच्या परिसरात धामणी नदीपात्रात खडखडाट झाला आहे. कृषिपंप उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे सुमारे २५ गावांतील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्वखर्चाने घातलेल्या मातीच्या बंधाऱ्यांमधील पाणीसाठा पूर्णतः कमी झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ऊस पिकाला पाणी उपसा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पिके कशी जगवायची, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
- जयराम पाटील, शेतकरी, कोनोली पैकी पाटीलवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT