Nanded Water Crisis : नांदेडमध्ये मध्यम, लघू प्रकल्पांनी गाठला तळ

Water Scarcity : नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्यांत धरणसाठ्यात कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता.
Water Shortage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात एका मोठ्या प्रकल्पासह नऊ मध्यम व ८२ लघू प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील नागरिकांना जाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पांत २०५.१० दलघमीनुसार २८.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्यांत धरणसाठ्यात कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता. नांदेड जिल्ह्यातील एकूण १०४ प्रकल्पांत २०५.१० दशलक्ष घनमीटरनुसार २८.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Water Shortage
Water Crisis : पाणीटंचाई एकाला, निधी टाकला दुसऱ्या गावाला

जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात १९.८६ दलघमीनुसार २४.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ५९.०६ दलघमीनुसार ४२.७५ टक्के पाणीसाठा आहे.

यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ३६.२४ दलघमीनुसार २६.०६ टक्के, चार कोल्हापुरी बंधाऱ्यात शून्य टक्के, ८० लघू प्रकल्पात ३०.७५ दलघमीनुसार १७.८० टक्के पाणीसाठा राहिला आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ५९.१४ दलघमीनुसार ३१.१६ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात २०५.१० दलघमीनुसार २८.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Shortage
Water Conservation Crisis: जलसंधारणात निधीचा दुष्काळ

यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४२५.९० दलघमीनुसार ५२.५९ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ८.१३ दलघमीनुसार १०.०४ टक्के पाणीसाठा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ४४८.७८ दलघमीनुसार ४६.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी १९.८६ २४.५८

मानार ५९.०९ ४२.७५

मध्यम प्रकल्प (९) ३६.२४ २६.०६

लघू प्रकल्प (८०) ३०.७५ १७.८०

उच्चपातळी बंधारे (९) ५९.१४ ३१.१६

एकूण प्रकल्प १०४ २०५.१० २८.१७

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ४२५.९० ५२.५९

सिद्धेश्‍वर ०८.१३ १०.०४

इसापूर ४४८.९० ४६.५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com