Vithhal Rukmini Mandir Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन महापूजेवेळी राहणार सुरू

Pandhatpur Vithhal Temple : भाविकांना जलद दर्शन व्हावे, यासाठी व्हिआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे, त्या कामामुळे विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल २४ जूनपर्यंत पूर्ववत कराव्यात.

Team Agrowon

Solapur News : आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरू असतानाही भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे, यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे, अशी सूचना पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (ता. १२) केली.

आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, तेजस्विनी आफळे, लेखाधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, की भाविकांना जलद दर्शन व्हावे, यासाठी व्हिआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे, त्या कामामुळे विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल २४ जूनपर्यंत पूर्ववत कराव्यात.

तसेच यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सद्यःस्थितीत सुरू असलेले काम थांबवून सदर ठिकाणची स्वच्छता करावी. या कालावधीत नामदेव पायरी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

या वेळी औसेकर यांनी, भाविकांना श्रीं विठ्ठलाचे जलद दर्शन व्हावे. तसेच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी जादा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT