Alandi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Alandi Kartili Wari : अवघी अलंकापुरी दुमदुमली...

Alandi News : राज्यभरातून आळंदीत कार्तिकी वारीस हजेरी लावण्यासाठी भाविकांचा ओघ गेली चार पाच दिवसांपासून सुरूच आहे.

Team Agrowon

Pune News : विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥ तये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥ ही भावना ऊरी ठेवून राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या मांदियाळीने अवघी अलंकापुरी दुमदुमुन गेली. बरोबर ठिकठिकाणाहून आलेल्या शेकडो दिंड्यांनी मंदिर आणि नगरप्रदक्षिणा रस्ता फुलून गेला. दरम्यान आज (ता.९) माऊलींची पालखी दुपारी नगर प्रदक्षिणेसाठी देवूळवाड्याबाहेर पडेल.

राज्यभरातून आळंदीत कार्तिकी वारीस हजेरी लावण्यासाठी भाविकांचा ओघ गेली चार पाच दिवसांपासून सुरूच आहे. दरवर्षीच्या तुलनेत शुक्रवारी (ता.८) दशमीच्या दिवशी गर्दी कमी होती. वारकरी तीर्थ स्नानासाठी इंद्रायणी नदीकाठ पहाटेपासूनच फुलून गेला.

स्नानानंतर भाविक माऊलींच्या समाधी दर्शनासाठी दर्शन मंडपात जात होते. दर्शनासाठी पाच तास लागत असल्याचे भाविकांनी सांगितले. इंद्रायणीवरील भक्ती सोपान पुलावरून दर्शनाची रांग पलिकडे गेली होती. इंद्रायणीकाठी, पुंडलिक मंदिर, प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची गर्दी होती.

दरम्यान, मध्यरात्री बारानंतर एकादशीच्या पहाटपुजेसाठी आणि मंदिर स्वच्छतेसाठी दर्शनबारी काही काळ थांबविण्यात आली. त्यानंतर साडेबारा वाजता पहाटपूजा सुरू झाली. यामध्ये पवमान पूजा अभिषेक होईल.

श्रींच्या पहाट पूजेसाठी निमंत्रितांना श्री हनुमान दरवाजातून प्रवेश दिला जाईल. पासधारकांना हरिहरेंद्र स्वामीमठासमोरील देवस्थानच्या जिन्यातून मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल.

देवुळवाड्यातील आजचे कार्यक्रम...

- मध्यरात्री ते पहाटे दोनपर्यंत ः माऊलींच्या समाधीवर पवमानपुजा आणि अभिषेक. बरोबर ११ ब्रम्हवृंदाचा मंत्रघोष.

- दुपारी बारा ते साडे बारादरम्यान महानैवेद्य

- दुपारी एक ः माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा

- रात्री साडे आठ वाजताः पालखीचे मंदिरात आगमन व धुपारती.

- रात्री बारा ते चार ः मोझे यांच्या वतीने जागर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: ३ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा; पावसाला पोषक स्थिती

Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर

Zero Residue Grapes Production: ‘झीरो रेसिड्यू’ द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे

Sugarcane Water Management: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

SCROLL FOR NEXT