Millets and Wild Vegetables Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Innovation : भरडधान्य, रानभाज्यांची मूल्यसाखळी विकसित करणे गरजेचे : डॉ. जाधव

Developing a Value Chain : भरडधान्यावर संशोधन, उत्पादकता वाढवणे यासह प्रक्रिया मूल्यवर्धन गरजेचे आहे. यासाठी रानभाज्या व भरडधान्यांची मूल्यसाखळी तयार व्हावी.

Team Agrowon

Nashik News : नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या शेती क्षेत्र आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे शेतीतून प्रगती साधण्यासाठी मार्ग शोधले पाहिजे. भरडधान्यावर संशोधन, उत्पादकता वाढवणे यासह प्रक्रिया मूल्यवर्धन गरजेचे आहे. यासाठी रानभाज्या व भरडधान्यांची मूल्यसाखळी तयार व्हावी, असे प्रतिपादन बायफ संस्थेचे पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. रविराज जाधव यांनी केले.

बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन आणि के. के. वाघ कृषी, उद्यानविद्या, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २१) के. के. वाघ कृषी महाविद्यालयात रानभाज्या आणि मिलेट प्रदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी डॉ. जाधव बोलत होते.

व्यासपीठावर बायफचे कार्यक्रम अधिकारी संजय पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यक्रम समन्वयक प्रदीप खोसे, कृषी महाविद्यालय समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश हाडोळे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत देशमुख, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाचपोर, उद्यानविद्याचे प्राचार्य विकास संधान, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एन. जी. देवशेटे आदी उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले, की हवामान बदलांचा परिणाम शेतीवर दिसत आहे. बदलत्या काळात देशी वाणांचे संवर्धन व देशी गाय संवर्धन काळाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये संघटितपणे काम गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देवशेटे यांनी केले. श्री. सेवलीकर सर यांनी के. के. वाघ शिक्षण संस्थेचा प्रवास मांडला. बायफचे डॉ. मणिभाई देसाई आणि संस्थेचे अध्यक्ष कै. बाळासाहेब वाघ यांचे ऋणानुबंध मांडले. प्रा. अश्विनी चोथे यांनी रानभाज्यांची माहिती दिली. आदिवासी भागातील रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, औषधी गुणधर्म, पाककृती समजून सांगितल्या.

या वेळी रंजना ब्राह्मणे, वनिता ठाकरे आणि देवराम भांगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बायफचे प्रकल्प अधिकारी राहुल जाधव, तेजस देवरे, अभिजित कराळे, नंदलाल चौधरी, प्रा. तुषार उगले उपस्थित होते. या चर्चासत्राला जवळपास ३०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनाला १००० विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्रदर्शनात नंदुरबार, इगतपुरी, खेड, अकोले, जव्हार येथील शेतकऱ्यांनी जवळपास १५० च्या वर रानभाज्या नमुने आणि भरडधान्य मांडले होते.

अन्नसुरक्षेकडून पोषणसुरक्षेकडे जाण्याची गरज

आता अन्नसुरक्षिततेकडून पोषणसुरक्षेकडे जाण्यासाठी आपण भरडधान्यांकडे शहाणपणाने पाहिले पाहिजे. जगभरात गरिबांचे अन्न म्हणून ओळखले जायचे; मात्र आता त्यातील पोषणमूल्य बघून मागणी वाढत आहे. त्यामुळे उत्पादनवाढ व स्थानिक जातींचे संवर्धन या विषयावर संजय पाटील यांनी लक्ष वेधले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT