Shivraj Singh Chouhan Agrowon
ॲग्रो विशेष

Developed Agriculture Mission: विकसित कृषी संकल्प अभियानास ओडिशातून सुरुवात

Farmer Awareness Campaign: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली विकसित कृषी संकल्प अभियानाची ओडिशातील पुरी येथून भव्य सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

New Delhi News: शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गुरुवारपासून (ता.२९) ओडिशातील पुरी येथून विकसित कृषी संकल्प अभियानास सुरुवात करण्यात आली. हे अभियान केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राबविले जाणार आहे.

विविध राज्यांतील सुमारे १.५ कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचून त्यांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. २९ मे ते १२ जूनपर्यंत या काळात हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान सुमारे २० राज्यांचा प्रवास करणार आहेत.

या दरम्यान ते शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधणार आहेत. या अभियानात एकूण २,१७० पथके सहभागी होणार असून ७०० हून अधिक जिल्हे, ६५,००० गावांत हे अभियान राबविले जाणार आहे.

विविध राज्यांतील शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, सरकारी योजना आणि धोरणांबद्दल जागरूकता निर्माण करणे, पीक निवड आणि संतुलित खत वापरासाठी मृदा आरोग्य कार्ड वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. तसेच शेतकऱ्यांना नवकल्पना समजून सांगितल्या जाणार असून संशोधनाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT