
Chhatrapati Sambhajinagar : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड यांच्या वतीने २९ मे ते १२ जून या कालावधीत ‘विकसित कृषी संकल्प यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा जिल्ह्यातील ९० गावांत जाणार आहे.
वनामकृवि, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, अटारी, पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय, वनामकृवि, परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केव्हीके, छत्रपती संभाजीनगर-१ च्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यांतील ९० गावांमध्ये विविध कृषी विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करून ही मोहीम राबवण्यात येऊन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसार व अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे, सरकारी योजनांबद्दल जनजागृती करणे आणि शेतकरी, अधिकारी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढवणे हा आहे.
या कार्यक्रमासाठी कृषी विभाग व शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील इतर सर्व विभागांची मदत घेण्यात येणार आहे. केव्हीकेचे शास्त्रज्ञ, विद्यापीठचे शास्त्रज्ञ, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे देण्यात आलेले शास्त्रज्ञ, कृषी विभाग, ‘आत्मा’चे अधिकारी, ‘इफको’चे अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश असणाऱ्या दोन चमूंची निर्मिती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात २९ मे कुंभेफळ, भांबरडा, दुधड, मुरुमखेडा, पिंपळखुंटा, लाडसावंगी, ३० मे - टोणगाव, हिवरा, जडगाव, जडगाव - २, पिंप्री राजा, आडगाव, ३१ मे - सय्यदपूर, औरंगपुरा, ढासला, ढवहापुरी, कासनापूर, फेरण जळगाव १ जून - शेलूद, चारठा, हातमाळी, नायगव्हाण, लामकाना, लामकानावडी, पैठण तालुक्यात २ जून - आडूळ, रजापूर, देवगाव, दाभरूळ, आंतरवाली, एकतूनी, ३ जून - बिडकीन, शेकटा, तोंडोळी, लोहगाव खु, लोहगाव खु, लोहगाव बु, मुलानी वडगाव, ४ जून - ढोरकीन, कारकीन, टाकळी पैठण, बोरगाव, भालगाव, इसारवाडी, ५ जून - पांगरा, निलजगाव, पोरगाव, लाखेगाव, पाडळी, डोणगाव.
फुलंब्री तालुक्यात ६ जून - सांजूळ, बिल्डा, विटेकरवाडी, गणोरी, किनगाव, वारेगाव, ७ जून - पिंपळगाव देव, पिंपळगाव वळण, आडगाव, वाहेगाव, डोंगरगाव शिव, शिरोडी खु., ८ जून - पाल/पाथ्री, डोंगरगाव कवाड, पीर बावडा, गिरसावळी, मारसावळी, बाभूळगाव, ९ जून - बाबरा, वाहेगाव, निधोना, चिंचोली नकीब, कान्हेगाव, चिंचोली हिवरा, सिल्लोड तालुक्यात १० जून - बनकिन्होळा, निल्लोड, गेवराई सेमी, भवन, केऱ्हाळा, पळशी, ११ जून - अन्वी, रहिमांबाद, आसाडी, सारोळा, पानवडद, पांगरी, सोयगाव तालुक्यात १२ जून - जांगला, लोणापूर, सावरखेडा, वरखेडी, फर्दापूर, जामठी. अशा प्रकारे या जागर दौऱ्याचे नियोजन असून पाच तालुक्यांतील ९० गावांतून हा दौरा जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.