Nitin Gadkari Agrowon
ॲग्रो विशेष

Nitin Gadkari : गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा

Latest Agriculture News : व्यवसाय करण्यासाठी भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ आणि व्यावहारिकता या चार गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘व्यवसाय करण्यासाठी भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ आणि व्यावहारिकता या चार गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते. आपले उत्पादन चांगले असेल, त्याचे ब्रँडिंग आणि पॅकेजिंग उत्तम असेल तर ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोच, पण त्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा,’’ असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. ८) केले.

‘एमएसएमई’ कार्यालयाच्या सहकार्याने मेहमुदा शिक्षण आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नीरीच्या सभागृहात ‘मध्य भारतात उद्यमशीलतेच्या संधी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. या वेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, माजी मंत्री डॉ. अनिस अहमद, ‘एमएसएमई’चे संचालक पी. एम. पार्लेवार, ‘सीएसआयआर-नीरी’चे संचालक डॉ. अतुल वैद्य, डॉ. प्रमोद खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

श्री.गडकरी म्हणाले, ‘‘व्यवसायात वक्तशीरपणा आणि विश्वासार्हतेसह गुणवत्तेला खूप महत्त्व आहे. लोकांना आवडेल असे उत्पादन तयार करणे आणि त्याची गुणवत्ता कायम राखणे या दोन बाबींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी ज्ञान हे सर्वोत्तम माध्यम आहे. या सर्वांची सांगड घातली तर महिलांना यशस्वी उद्योजक होणे नक्कीच शक्य आहे.’’

‘‘‘एमएसएमई’ने महिला उद्योजकांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी अनेक योजना आणल्या. पूर्वी महिलांना कर्ज घेताना बँक गॅरंटी द्यावी लागायची, पण आता या कर्जाची गॅरंटी सरकारने घेतली आहे.

त्यामुळे महिलांनी अधिकाधिक प्रयत्न करून नावीन्यपूर्ण उद्योगासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आपल्याला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्राचा अभ्यास करून दिशा ठरवावी,’’ असेही श्री. गडकरी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT