Nitin Gadkari : शेती क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी

Article by Vinod Ingole : भारतीय शेतकऱ्यांनी देखील त्यानुसार शेतीपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकाव धरू शकणार नाहीत.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Nitin Gadkari : जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात अनेक स्थित्यंतरं होत आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी देखील त्यानुसार शेतीपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकाव धरू शकणार नाहीत.

अशा वेळी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासोबतच त्यांना नवीन बदल स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘ॲग्रोवन’ गेल्या १८ वर्षांपासून याच दिशेने काम करत आहे. त्यामुळेच हे दैनिक भारतीय शेतीसाठी मोठी उपलब्धी असल्याचे माझे मत आहे.

ग्रामीण संपत्तीनिर्मितीत साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे. आज इथेनॉल नसते तर साखर कारखाने बंद पडले असते. देशातील ऊस उत्पादकांची अवस्था विदारक झाली असती. आज इथेनॉलमुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

बायोफ्युएल, बिटूमन, बायोएव्हीऐशन फ्युएल तयार होत आहे. त्यामुळे भारतीय शेतीचा चेहरामोहरा निश्‍चितच बदलणार आहे. ही सुरुवात असून त्याला अपेक्षित गती लवकरच मिळेल, असा मला विश्‍वास आहे. या आघाडीवर ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी पुढे आले पाहिजे.

Nitin Gadkari
Dairy Industry : दुग्ध व्यवसायामुळे बसली संसाराची आर्थिक घडी

जल, जंगल, जमीन आणि जानवर याची उपलब्धता हे आपले बलस्थान आहे. त्याला जागतिक स्तरावर उपलब्ध तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण भागात उद्योग उभारण्याची गरज आहे. बांबूसारख्या पिकामध्ये अनेक संधी आहेत. फर्निचर, क्रॅश बॅरियर्स, कोळशाला पर्याय म्हणून वीज केंद्रात बांबू पॅलेटचा वापर असे बांबूचे अनेक उपयोग आहेत.

बांबूची मागणी लक्षात घेता पडीक जमीनीवर बांबू लागवड वाढवता येईल. सध्या जिनिंग, प्रेसिंग, ऑइल, डाळ मिल यापुढे गावस्तरावर उद्योग दिसत नाहीत. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फर्निचर तयार होत आहे. बेंगळुरू विमानतळाच्या बांधणीत बांबूचा वापर होतो आहे. विमानात प्लॅस्टिकऐवजी बांबू चमच्यांचा वापर होत आहे.

नाशिक येथील विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने यशस्वी बिजनेस मॉडेल विकसित केले आहे. द्राक्ष निर्यातीपासून सुरुवात करून या कंपनीने आता शेतीमाल प्रक्रिया, निर्यात व एकूणच मूल्यसाखळी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

अशा प्रकारचे व्यावसायिक धोरण असेल तरच शेतकरी कंपन्या यशस्वी होतात. शेती क्षेत्रातील यशस्वी मॉडेलची माहिती ‘ॲग्रोवन’मुळेच माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना मिळाली. अशा यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.

भारतातील कृषी विद्यापीठे तंत्रज्ञान उपलब्धता, संशोधनात पिछाडीवर आहेत. त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेतीवर होतो आहे. विद्यापीठे एका चौकटीत अडकल्यामुळे कृषी संशोधन आणि विस्तार यांत मोठी दरी पडली आहे. ती दूर करण्याचे काम ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून होत आहे.

जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रात होणारे बदल व्यापक आणि आश्‍चर्यकारक आहेत. त्यांच्याकडे जमीनधारणा अधिक असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय फायदेशीर ठरतो. परंतु भारतीय शेतीमध्ये कमाल जमीनधारणा क्षेत्र कमी होत आहे. अशा शेतीमध्ये मशागतीसाठी ना मजूर ना भाडेतत्वावरील यंत्र फायदेशीर ठरतात. परंतु उदरनिर्वाहाचे साधन असल्याने शेती सोडताही येत नाही. त्यावर शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून गावागावांत अवजारे बॅंकेचा चा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. ‘ॲग्रोवन’ने याकामी जाणीवजागरण केले पाहिजे.

Nitin Gadkari
Fodder Management : देशी गोवंश संवर्धन अन् आदर्श चारा व्यवस्थापन

पाणी आणि वीज या शेतीक्षेत्रासमोरील आज सगळ्यात मोठ्या समस्या आहेत. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावणे, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावणे, गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात असे धोरण असले पाहिजे. आमच्या पूर्ती सिंचन संस्थेच्या माध्यमातून या कामावर भर देण्यात आला आहे. विदर्भात पाणी नाही, असे म्हटले जाते.

मात्र पाण्याची मुबलकता असून, गोदावरीचे कितीतरी टीएमसी पाणी समुद्रात जाते. या पाण्याचे नियोजन झाले तर कितीतरी मोठे क्षेत्र सहज सिंचनाखाली येणार आहे. राज्य आणि देशपातळीवर देखील अशा कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ‘ॲग्रोवन’मधून अशा कामांची दखल घेऊन बळ मिळाल्यास अशा कामांसाठी गावकरी उत्स्फूर्तपणे पुढे येतील.

पारंपरिक विजेच्या उपलब्धतेत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे उद्योग, घरगुती आणि शेतीच्या वापरासाठी वीज कमी पडते. त्यावर सौरऊर्जेचा पर्याय पूरक ठरणार आहे. मी देखील या पर्यायाचा वापर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. माझ्याकडे साडेसात अश्‍वशक्‍तीचे तीन पंप आहेत. बारा तास चालतात आणि विजेचे बिलही शून्य येते.

आपल्याकडे सूर्यप्रकाशाची मुबलकता आहे. त्याचा सुयोग्य वापर केला तर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, हा माझ्या जीवनाचा उद्देश आहे. त्याकरिता मी प्रयत्नरत आहे. तंत्रज्ञान प्रसार आणि विस्तार कार्यातून ‘ॲग्रोवन’ची देखील या कामात साथ मिळाली आहे. प्रबोधन, प्रशिक्षण, माहिती आणि भविष्याची प्रेरणा असे शेतीक्षेत्रातील सारे काही या दैनिकातून मिळते.

(शब्दांकन : विनोद इंगोले)

नितीन गडकरी, केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com