Nitin Gadkari : देशात ३०० नवे इथेनॉलपंप सुरू होणार : नितीन गडकरी

Ethanol Pump : केंद्र सरकारची अंगीकृत कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने देशभरात ३०० इथेनॉल पंप देशभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र सरकारची अंगीकृत कंपनी असलेल्या इंडियन ऑइलने देशभरात ३०० इथेनॉल पंप देशभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तसेच साखर उद्योगातील विविध मान्यवर होते. ‘‘भारतीय शेती व्यवस्थेत ऊस हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. मात्र आता केवळ साखर उत्पादन वाढवून चालणार नाही. उपपदार्थांकडे वळावे लागेल.

भविष्याचा वेध घेत साखर उद्योगाला वाटचाल करावे लागेल. त्यासाठी आपल्याला आधी समस्या समजावून घ्यावी लागेल. हरितक्रांतीमुळे उत्पादकता वाढली; मात्र दुर्दैवाने बाजारभाव वाढलेले नाहीत.’’ असे ते म्हणाले.

Nitin Gadkari
Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवरील बंधनांचा फेरविचार करा

मी स्वतः शेतकरी आहे, असे अभिमानाने सांगत श्री. गडकरी म्हणाले, ‘‘विदर्भात शेती करतो. तेथे तीन साखर कारखाने आम्ही चालवतो. तेथील सामाजिक, आर्थिक परिस्थिती एक दिवस सुधारेल, अशी स्वप्ने पाहिली जात आहेत. त्यासाठी भात उत्पादक हे ऊस उत्पादनाकडे वळतील.

त्यांच्याकडे पैसा येईल व तेथील आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘व्हीएसआय’ने नागपूरमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्याची मागणी मी केली होती व ती पवार साहेबांनी स्वीकारली. याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.’’

Nitin Gadkari
Ethanol Production : आठ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवू द्या

हे केवळ पवार साहेबांमुळे घडले

पश्‍चिम महाराष्ट्राची भरभराट का झाली याचे कारण सांगत श्री. गडकरी यांनी श्री. पवार यांची जाहीर स्तुती केली. ‘‘राज्याचा साखर उत्पादक पट्टा त्यातही विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्र हा विकासात पुढे गेला. दरडोई उत्पन्न वाढले. हे केवळ उसामुळे झाले आहे. त्याचे श्रेय व्हीएसआयचे व विशेषतः या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांचे आहे,’’ असे गौरवोद्‍गार श्री. गडकरी यांनी काढले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले..

- साखर उद्योगाला जैवऊर्जा उद्योगात रूपांतरित करावे लागेल.
- हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन राहील. ‘टाटा’ने हायड्रोजनवर चालणारा ट्रक तयार केला आहे.
- हायड्रोजन इंधन म्हणून वापरण्यासाठी वाहनांच्या फ्लेक्स इंजिन येतील.
- बायोसीएनजीवर चालणारा जेसीबीदेखील जगात तयार झाला आहे.
- साखर उद्योगाने हवाई जैव इंधन निर्मितीकडे देखील वळायला हवे.
- बायोसीएनजी आता ट्रॅक्टर, ट्रकमध्ये वापरला जातो. त्याचा वापर पुढे वाढत जाणार.
- शेतकरी आधी अन्नदाता होते. पण ते आता बिटुमीनदाता, हवाई इंधनदातादेखील झाले आहेत.
- साखर उद्योगाने जैव बिटुमीन (डांबर) उत्पादनात उतरावे. द्याल तेवडे आम्ही ते खरेदी करू.
- ८० रुपयांपेक्षा कमी खर्चात हरित हायड्रोजन तयार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com