Galyukt Shiwar Agrowon
ॲग्रो विशेष

Galyukt Shiwar : हिंगोलीत जलेश्‍वर तलावातील गाळ काढणे सुरू

Galmukt Dharan : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्‍वर तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून कमाल ३७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येत आहे.

Team Agrowon

Hingoli News : ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्‍वर तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून कमाल ३७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावे‌, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत हिंगोली येथील जलेश्‍वर तलावातील गाळ काढण्याचे काम मागील दोन महिन्यापासून चालू आहे.या कामाची पापळकर यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अनंत जवादवार, जलसंधारणचे उपअभियंता प्रफुल्ल खिराडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपअभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे, प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर आदी उपस्थित होते.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत पापळकर म्हणाले, की जलेश्‍वर तलावातील गाळ काढण्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून टिप्पर, टॅक्टर आदी विविध वाहनांमधून आपापल्या शेतामध्ये गाळ घेऊन जात आहेत. मागच्या शंभर वर्षांत या तलावातील गाळ काढलेला नव्हता. त्यामुळे या तलावामध्ये साठलेला गाळ हा अत्यंत सुपीक असा उच्च प्रतीचा असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गाळ नेल्यास त्यांना ३७ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी गाळाचे योग्यरीत्या मोजमाप झाले पाहिजे. हिंगोली शहराचे वैभव असलेल्या जलेश्‍वर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे.

सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले असून, तलावात येणारे घाण पाणी रोखण्यासाठी नाली बांधकामाचे व पाणी वळविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे. या तलावाला चांगले पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. बोटिंग, ॲम्पिथिएटर, सेल्फी पॉइंट, ओपन जीम, पार्किंग, फूड प्लाझा आदींची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यामुळे हिंगोली शहरातील व परिसरातील नागरिकांची पर्यटनाची सोय होणार आहे. खिराडे म्हणाले जलसंधारण विभागाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ लाख ५० हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. त्यासाठी रात्रंदिवस १८ पोकलेन व जेसीबी चालू असून जवळपास १०० ट्रॅक्टर व हायवाद्वारे हे काम चालू असू,न जून अखेर ४ लाख ५० हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७, तंबाखूजन्य पदार्थांवर कर; जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग 

Solar System: जळगावातील ५०० ग्रामपंचायतींवर सौर यंत्रणा

Dam Water Storage: ‘कसमादे’तील धरणांमध्ये ८० टक्के जलसाठा

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवारची १६ कोटींची कामे रद्द

Local Body Elections: सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या ८,तर पंचायत समितीच्या १७ जागा बिनविरोध

SCROLL FOR NEXT