Crop loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop loan : 'सीबील'ची सक्ती करणाऱ्या बँकांविरुद्ध एफआयआर दाखल करणार; फडणवीसांचा बँकांना इशारा 

Devendra Fadnavis : एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे पीक कर्जासाठी सीबीलची सक्ती बँकांकडून केली जात आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंगळवारी (ता. २५) मुंबईतील सह्याद्री अतिगृहावर खरीप हंगामाच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर फडणवीस बोलत होते.  यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. तसेच रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, "पीक कर्जासाठी सीबीलची कारणे बँकांकडून दिले जात आहे. तर कर्ज देताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता अडवणूक किंवा टाळाटाळ केल्यास बँकांवर एफआयआर दाखल केला जाईल. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका." असा इशाराही फडणवीस यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.  

या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीची चर्चा झाली. यावेळी सीबीलबाबत सूचना करण्यात आल्या.शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सीबीलची अट लागू करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सीबीलची सक्ती केली जात आहे. त्यांना पीक कर्ज नाकारले जात आहे. पण आता असे काही झाले तर थेट बँकांवर एफआरआय दाखल करू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी देखील सीबील सक्तीबाबत बँकांना निर्देश दिले होते. मात्र आता पुन्हा सीबीलची सक्ती बँकांकडून केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT