Agriculture Drone  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : जळगाव सुपे येथे ड्रोनद्वारे पिकावर औषधे फवारणी प्रात्यक्षिके

Drone Spraying : जळगाव सुपे (ता. बारामती) येथे बारामती ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली.

Team Agrowon

Baramati News : जळगाव सुपे (ता. बारामती) येथे बारामती ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने ड्रोनद्वारे औषधे फवारणीचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच यावेळी करडई व कांदा या पिकाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकरी दिगंबर जगताप यांच्या एक एकर करडईच्या व आनंदाराव खोमणे यांच्या कांदा या एक एकर पिकावर ड्रोनद्वारे औषधांची फवारणी करण्यात आली. ही औषधांची फवारणी अर्ध्यातासात पूर्ण झाली.

यावेळी शेतकरी व अधिकारी यांची करडई, ज्वारी व कांदा या पिकाची पाहणी करण्यासाठी शिवारफेरी काढण्यात आली होती.

डॉ. सुरेश गवांडे यांनी कांदा या पिकावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच करडई या पिकाबाबत तालुका कृषी सुप्रिया बांदल यांनी मशागत, लागवड , कीड रोग नियंत्रण व काढणी आदींसह सविस्तर माहिती दिली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे, राजगुरुनगर येथील कांदा संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश गावंडे, कृषी मंडल अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी सहाय्यक संध्या लव्हे, ॲग्रोस्टार शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सुनील जगताप, संचालक अनिल वाघ तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाघ व आभार सुनील जगताप यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT