Common Incubation Center Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Production : कॉमन इनक्युबेशन सेंटरमध्ये गूळनिर्मिती चाचणी प्रात्यक्षिक

Common Incubation Center : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र, (कॉमन इनक्युबेशन सेंटर) ची उभारणी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये केंद्र शासनाच्या साहाय्याने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र, (कॉमन इनक्युबेशन सेंटर) ची उभारणी करण्यात आली आहे. या उष्मायन केंद्रामध्ये गूळ निर्मिती चाचणी प्रात्यक्षिकास गुरुवारी (ता. २२) प्रारंभ करण्यात आला.

चाचणी प्रात्यक्षिकाचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. इंद्र मणी, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आयएआरआय) संचालक डॉ. ए. के. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळबांडे,

प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. सुरेंद्र सदावर्ते, डॉ. अनुप्रीता जोशी, डॉ. वेदप्रकाश सुर्वे, डॉ. कैलास गाढे, डॉ. प्रवीण घाटगे, डॉ. गिरीश माचेवाड, डॉ. भारत आगरकर, डॉ. भानुदास पाटील, डॉ. भोकरे आदी उपस्थित होते.

या उष्मायन केंद्राअंतर्गत गूळ, गूळ पावडर, गूळ वड्या (क्युब), काकवी निर्मिती, ऊस रसापासून पेय बनविणे, बॉटलिग तसेच मसाले प्रक्रिया उद्योग अंतर्गत हळद पावडर, मिरची पावडर तसेच मसाले निर्मिती उद्योगांचे प्रशिक्षण नव उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला स्वयंसहाय्यता गट, प्रक्रिया उद्योजक यांना देण्यात येणार आहे.

व्यापारी तत्त्वावर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. प्रक्रिया उद्योजकांना या केंद्रांतील यंत्र सामग्री भाडे तत्त्वावर वापरण्यास देण्यात येणार आहे. या अंतर्गत आधुनिक गुळप्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन), पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे विपणन व्यवस्थापक सत्यवान वऱ्हाडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावर यांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crop Damage: अमरावती विभागात तीन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर, धरणांतून विसर्गात वाढ

Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ

Vidarbha Rain Alert: पश्चिम विदर्भात पावसाने मांडले ठाण

MPKV Vice Chancellor: महात्मा फुले विद्यापीठासाठी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT