Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि नवी दिल्ली येथील आयओटेक यांच्यातर्फे गुरुवारी (ता. ३०) परभणीतील कारेगाव आणि पिंगळी येथे कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी ड्रोनची प्रात्यक्षिके नियोजित केली आहेत. गुरुवारी (ता. ३०) कारेगाव आणि पिंगळी येथे या प्रात्याक्षिकांचे उद्घाटन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते करण्यात आले.
कारेगाव येथील कृषिभूषण सोपानराव अवचार तर पिंगळी येथील प्रगतशील शेतकरी अमन खुराणा यांच्या शेतावर कृषी ड्रोनची प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. एम. खोडके, नाहेप प्रकल्पाचे मुख्य संशोधक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. व्ही. के. इंगळे, प्रा. दतात्रय पाटील आदी प्रमुख उपस्थिती होती. आयओटेकचे तंत्रज्ञ राहुल मगदुम, अभियंता अंजिक्य यांनी ही प्रात्यक्षिके सादर केले.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की भविष्यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे तंत्रज्ञान मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याकरिता कृषी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
डॉ. व्ही. के. इंगळे, इंजि. दत्ता पाटील, इंजि. श्रद्धा मुळे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. श्वेता सोळंके, इंजि. अंजिक्य ब्रह्मनाथकर, डॉ. शिवराज शिंदे यांनी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.