Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नुकसान भरपाई देण्‍याची शेतकरी संघटनेची मागणी

Crop Damage Compensation : फळ पीक विमा नुकसान भरपाई, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांबाबत जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले; मात्र याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

Team Agrowon

Sindhudurg News : शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील फळ पीक विमा नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्यावतीने १ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयोसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. फळ पीक विमा नुकसान भरपाई, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांबाबत जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले; मात्र याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील फळ पीक विमा नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी फळ पीक विमा नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असताना गणेशोत्सव संपला तरी अद्याप भरपाईचे अनुदान मिळालेले नाही.

शासनाकडून शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय केला जात आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास १ ऑक्टोबरला जिल्ह्यातील काजू व आंबा उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला आहे.

याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, अर्जुन नाईक, प्रकाश वारंग, यशवंत सावंत, सुधीर परब, आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT