Fertilizer demand  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Demand News : रब्बीसाठी एक लाख ८० हजार टन खतांची मागणी

Fertilizers for the Current Rabi Season : कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मागणी केलेल्या खतांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे एक लाख ८१ हजार टन खतांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मागणी केलेल्या खतांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यांत पुरेसा पाऊस न पडल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे.

कृषी विभागाने लवकर तयारी करून बियाणे, खते पुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सरासरी दोन लाख ४९ हजार हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी केली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या वर्षी एक लाख ८५ हजार ९४० टन खतांची मागणी केली होती. त्याअनुषंघाने कृषी विभागाने नियोजन केले आहे. रब्बी हंगामात नत्र खतामध्ये युरियाला सर्वाधिक मागणी असण्याची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी ८५ हजार २५६ टन खतांची मागणी केली आहे.

त्यामुळे रब्बी हंगामात नत्रांची अडचण भासणार नाही. तसेच एनपीके ही पाण्यातून देण्यात येणारी विद्राव्य खताचीही मागणी केली आहे. परंतु शेतकऱ्यांना कृषी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार पीओएस मशिनवर नोंदणी केल्याशिवाय खते मिळणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

महिनानिहाय मागणी केलेली खते, टनांमध्ये :

महिना --- मागणी केलेली खते

आँक्टोबर -- १८,१००

नोव्हेंबर -- २७,१४०

डिसेंबर --- २७,१५०

जानेवारी -- ३६,२००

फेब्रुवारी ---३६,२००

मार्च --- ३६,२००

खरिपात पुरेसा पाऊन न झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे रब्बीत क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना खतांची आणि बियाणांची अडचण येऊ नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. दर महिन्याला शेतकऱ्यांना खते उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे फार अडचण येणार नाही, काही अडचणी आल्यास संबधित कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना खते उपलब्ध करून दिली जातील.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT