Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement Center : अमळनेरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी

Cotton Market : जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ची एकूण अकरा केंद्रे सुरू झाली आहेत. केवळ अमळनेरलाच केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Cotton Rate : अमळनेर ः जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी ‘सीसीआय’ची एकूण अकरा केंद्रे सुरू झाली आहेत. केवळ अमळनेरलाच केंद्र नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तेथे केंद्र सुरू करून तालुक्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी केली.

या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. सुरुवातीला बाजार समितीत आणि जीनमध्ये मका खरेदी सुरू असून प्रतिसाद मिळाला नसल्याचे कापूस महामंडळातर्फे सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. जिल्ह्यात ११ केंद्रांवर ‘सीसीआय’तर्फे कापूस खरेदी सुरू आहे.

शासकीय खरेदी केंद्रांवर बाजारभावापेक्षा ५०० ते एक हजार रुपयांनी जास्तीचा दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. अमळनेरला अद्याप असे शासकीय केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ‘सीसीआय’चे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती आणि संचालकांनीदेखील मागणी केली होती.

कापूस महामंडळाचे उपमहाप्रबंधक स्वप्निल दडमल यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी याबाबतची आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण करून ‘सीसीआय’चे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
- स्मिता वाघ, खासदार, जळगाव लोकसभा मतदारसंघ

गेल्या वेळी जिनर्स असोसिएशनने अमळनेरऐवजी पारोळा येथे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. आमचे प्रतिनिधी केंद्र सुरू करण्यासाठी अमळनेरला आले होते, त्या वेळी बाजार समितीने मका खरेदीला प्राधान्य दिले. कापूस खरेदीबाबत प्रतिसाद दिला नाही. तरीदेखील अमळनेरला केंद्रासाठी प्रयत्नशील आहोत.
- स्वप्नील दडमल, उपमहाप्रबंधक, कापूस महामंडळ, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा दर स्थिर; गाजर- भेंडीचे दर टिकून, आले दरात सुधारणा तर उडदाचे दर कमी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Mulberry Cultivation : सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले तुती लागवडीचे क्षेत्र

Dudhana Dam Water Level : निम्न दुधना प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

SCROLL FOR NEXT