Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Rate : राममंदिर उद्‍घाटनानिमित्त फुलांच्या मागणी, दरात दुपटीने वाढ

Team Agrowon

Pune News : अयोध्या येथील श्री राममंदिराचे उद्या, सोमवारी (ता. २२) उद्‍घाटन होत आहे. यानिमित्ताने पुणे शहरासह जिल्हा आणि परिसरातील गावे आणि शहरांमधून मंदिर सजावट आणि धार्मिक विधींसाठी विविध फुलांची मागणी आणि दर वाढले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुलांचे दर दुपटीने वाढले आहेत.

फुलांची दरवाढ आणि मागणीबाबत फूल बाजारातील प्रमुख आडतदार सागर भोसले यांनी माहिती दिली. भोसले म्हणाले, ‘‘अयोध्येतील राममंदिराच्या उद्‍घाटनामुळे पुणे शहरात देखील श्रीरामनवमीसारखे वातावरण निर्माण झाले आहे. शहर, जिल्हा आणि परिसरातील विविध गावांमधील बहुसंख्य मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने मंदिराच्या सजावटीसाठी देखील फुलांची मागणी वाढली आहे.

यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या केशरी फुलांना विशेष मागणी असून, केशरीसह पिवळ्या झेंडूची देखील मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलेनत हे दर दुपटीने वाढले असून, केशरी झेंडूला १०० ते १३०, तर पिवळ्या झेंडूला ६० ते ७० असे दर आहेत. हे दर रविवार (ता. २१)पर्यंत वाढलेले राहतील असा अंदाज आहे.

पुणे शहरातील किरकोळ फूल विक्रेत्यांसह विविध मंदिरांकडून थेट खरेदीमध्ये वाढ झाली असल्याचेही भोसले यांनी सांगितले. तसेच पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातून देखील मागणी वाढली असून, कोकणातून रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातून देखील मागणी वाढली आहे.

विविध फुलांचे प्रति किलोचे दर

झेंडू केशरी मोठा - १००-१३०, लहान ५०-८०, झेंडू पिवळा मोठा ६०-७०, लहान ४०-५०, गुलछडी - २००-२५०, बिजली ६०-१००, कापरी - ६०-१००, शेवंती - ८०-१५०, ॲस्टर (४ गड्डी) १६-२५, गुलाब गड्डी (१२ नग)- २०२-३०, गुलछडी काडी - ५०-१००, डच गुलाब (२० नग) १००-२५०, जरबेरा ३०-५०, कार्नेशन १००-१५०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT