Flower Exhibition : ‘एम्प्रेस गार्डन’चे पुष्पप्रदर्शन २५ जानेवारीपासून

Empress Garden : शहरातील प्रसिद्ध ‘एम्प्रेस गार्डन’च्या पुष्प प्रदर्शनाची पुष्पप्रेमी नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. असे हे ‘एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन’ २५ जानेवारीपासून सुरू होत आहे.
Flower Exhibition
Flower ExhibitionAgrowon

Pune News : ‘‘शहरातील प्रसिद्ध ‘एम्प्रेस गार्डन’च्या पुष्प प्रदर्शनाची पुष्पप्रेमी नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. असे हे ‘एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन’ २५ जानेवारीपासून सुरू होत आहे.

Flower Exhibition
Flower Farming : शेवंती फुलशेतीत यवतने मिळवली ओळख

विविध प्रकारच्या पुष्परचना हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे,’’ अशी माहिती एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मानद सहसचिव अनुपमा बर्वे, मानद सचिव यशवंत खैरे, रोज सोसायटीचे नीलेश आपटे आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार (ता. २५) दुपारी १२.०० वाजता ट्रॅफिक विभागातील पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी रोज सकाळी ९ ते रात्री ७.३० पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

Flower Exhibition
Flower Farming : शेतकरी नियोजन ः फुलशेती

‘‘यंदा जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार, स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील. हे प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सुरू राहील.

शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवारी (ता.२१) होईल. पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शनात सहभागी होतात,’’ असेही पिंगळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com