Niti Ayog Meeting Aap Agrowon
ॲग्रो विशेष

Niti Ayog Meeting Aap : नीती आयोगाच्या बैठकीवर दिल्ली सरकारचा बहिष्कार; ममता, नितीश, केसीआरांची बैठकीला अनुपस्थिती

Niti Ayog Meeting Update : नीती आयोगाच्या बैठकीला विरोधी पक्षाचा निषेध अधिक तीव्र होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२७) दिललीत बैठक घेतली जाणार आहे.

Team Agrowon

Prime Minister Narendra Modi : नीती आयोगाच्या बैठकीला विरोधी पक्षाचा निषेध अधिक तीव्र होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.२७) दिललीत बैठक घेतली जाणार आहे. परंतु या बैठकीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बहिष्कार टाकला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी देखील हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याबरोबरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Maan), तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी देखील अनुपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

नीती आयोगाच्या बैठकीत 'विकसित भारत @२०४७- रोल ऑफ टीम इंडिया' या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मात्र नीती आयोगावर टीका केली आहे.

जयराम रमेश म्हणाले, "पूर्वी नियोजन आयोग केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत होता. परंतु पंतप्रधान मोदींनी नीती आयोग आणून नियोजन आयोग रद्द केला. पंतप्रधान कार्यालयाचा अंग हा आयोग बनला आहे."

केंद्रा सरकारने वटहुकुमा काढून दिल्ली सरकारचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे भाजपेतर पक्षांच्या पाठिंब्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशव्यापी दौरा करत आहेत. त्यांनी नुकतीच ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशुकमार या नेत्यांची भेट घेतली आहे.

केजरीवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचीही भेट घेणार आहेत. कॉँग्रेस मात्र अजूनही याबद्दल संभ्रम अवस्थेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडे भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. भेट झाल्यानंतर कॉँग्रेस त्यावर भूमिका घेईल.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका वर्षभर असताना भाजप विरुद्ध मोट बांधण्यासाठी आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच रणनीतीचा भाग असून भाजपला कोंडीत पकडण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे.

परंतु कॉँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री बैठकीला हजर राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT