Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिके करपली

Agriculture Irrigation : २०२४–२५ रब्बी हंगामात पालखेड डावा कालवा पाणी नियोजन संदर्भात १७ जानेवारी २०२५ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली पार पडली.

Team Agrowon

Nashik News : पालखेड डावा कालवा प्रशासनाने कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला डावलून दुसरे आवर्तन जवळपास १५ ते १६ दिवसांनी उशिरा सोडले. परिणामी येवला तालुक्यातील पालखेड डाव्या कालव्याच्या टेल भागातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील कांदा, गहू, मका, भाजीपाला आणि चारा पिके ही करपून गेली. पालखेड डावा कालवा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आर्थिक झळ बसली आहे,असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

२०२४–२५ रब्बी हंगामात पालखेड डावा कालवा पाणी नियोजन संदर्भात १७ जानेवारी २०२५ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये संपूर्ण वर्षाचा सिंचन बिगर सिंचन आवर्तनाचे नियोजन चर्चा करून जाहीर करण्यात आले.

त्यानुसार पालखेड डाव्या कालव्याचे पहिले आवर्तन १२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ठरल्याप्रमाणे पार पडले.त्यामध्ये सिंचन आणि बिगर सिंचन दोन्ही मिळून २२ दिवसांचे आवर्तन देण्यात आले; परंतु दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारी ते २० मार्च असे सिंचन, बिगर सिंचन मिळून २४ दिवसाचे आवर्तन देण्याचे ठरले. परंतु पालखेड प्रशासनाने वरील कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला डावलून दुसरे आवर्तन जवळपास १५ ते १६ दिवसांनी उशिरा सोडले, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

योग्य ती चौकशी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीस पालखेड डावा कालवा प्रशासन जबाबदार आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटनेने केली आहे.

नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन उभारू

नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने करपलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी,ही मागणी करण्यात आली आहे.या मागणीची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांसोबत शेतकरी संघटना आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

याबाबतचे निवेदन जलसंपदा मंत्री विखे पाटील,आमदार छगन यांना शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे,बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे,संध्याताई पगारे,अरूण जाधव,सुरेश जेजूरकर,सुरेश कदम,बापूसाहेब पगारे,भाऊसाहेब चव्हाणके,राऊसाहेब गायकवाड,परसराम सोनवणे,प्रभाकर भोसले मंगेश गायकवाड,जगन्नाथ कांबळे,सुखदेव गायकवाड यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT