Crop Damage Compensation  Agrowon
ॲग्रो विशेष

Hailstorm Crop Damage : नुकसान भरपाई वेळेवर मिळणार का?

Crop Damage Compensation : गेल्या सप्ताहात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्यासह, डाळिंब, द्राक्षबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान आहे.

Team Agrowon

Nashik News : कसमादे भागात सटाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. मात्र, मागील दोन वर्षांपूर्वी गारपीट झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान भरपाईची पाहणी केली होती; मात्र नुकसान भरपाई एक वर्षानंतर मिळाली.

त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेवर मिळणार का? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समोर उपस्थित केला. मात्र पंचनामे झाल्यानंतर वेळेवर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन अॅड. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना दिले.

गेल्या सप्ताहात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्यासह, डाळिंब, द्राक्षबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवार (ता. ६) रोजी तालुक्यातील करंजाड खोऱ्यातील बिजोटे तर मोसम खोऱ्यातील जायखेडा येथे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी केली. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे त्यांच्यासमवेत होते. गारपीटग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी कोकाटे यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिल्या.

आश्वासन दिल्याप्रमाणे मदत मिळणार का ?

बिजोटे,जायखेडा या भागात गेल्या दोन वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात गारपीट झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात पाहणी दौरा करत तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्याचा हाती एक वर्ष उलटूनही मदत मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कृषिमंत्र्यांनी या पाहणी दौऱ्यानंतर आठ ते दहा दिवसात मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यावेळी नुकसान भरपाई वेळेवर न मिळणे, याशिवाय कांदाचाळ, पॅकिंग शेड, फळबाग लागवडी, ठिबक व यांत्रिकीकरण यासाठी शेतकऱ्यांचे अनुदान थकीत असल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

नुकसानग्रस्त शेतीपिकांचे तालुक्यात सात हजार हेक्टरवर नुकसान शासन अहवालात दाखविले आहे. प्रत्यक्षात ४० हजार हेक्टरहून अधिक शेतीपिके बाधित झाली आहेत. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
-दिलीप बोरसे, आमदार, सटाणा
पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करेन. शेतकऱ्यांना ह्या बिकट परिस्थितून पुन्हा उभारी घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल यासाठी व्यक्तिशः लक्ष घालणार आहे. प्रत्येक शेतकरी बांधव हा सक्षम असावा या विचाराचा ध्यास मला अविरत काम करण्यास सदैव प्रेरित करत असतो.याच प्रेरणेने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
- माणिकराव कोकाटे,कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT