Kolhapur News : पावसाने दैना उडवल्याने याचा फटका पिकांच्या उत्पादनावर झाला आहे. पीक परिस्थिती चांगली असताना अखेरच्या टप्प्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडावरचे हसू पळवले आहे.
भात, भुईमुगाच्या उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. भुईमुगाचे पन्नास तर भाताचे उत्पादन वीस टक्के घटणार आहे. पावसाने चार दिवस उघडीप दिली आहे. त्यामुळे ठप्प झालेली सुगीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. दिवाळीला सुरुवात झाली असून, सुगी घरी आणण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.
भाताला फूल धरण्याच्या अवस्थेतमध्ये पडलेल्या पावसाने चिंबाचे प्रमाण वाढले आहे. त्यात पावसाच्या माऱ्याने भात पडून कुजले असून, तर काही ठिकाणी उगवणं झाली आहे. शेतवडीतून पाणी वाहत असल्याने भात कापणी करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाचे सातत्य राहिल्याने जमिनीला वापसा आला नाही. याचा भुईमुगाच्या पिकावर परिणाम झाला. आऱ्या धरण्याच्या अवस्थेत मुळे कुजल्याने उत्पादनात घट झाली आहे.
भुईमुगाच्या झाळीला चार, पाच शेंगा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. पावसामुळे शेतवडीत दलदल आहे. त्यामुळे कापलेले भात अन्यत्र नेऊन मळणी काढण्यासाठी वाहतूक व मजुरांच्या खर्चात वाढ होणार आहे.
पावसाने भात शेतीचे नुकसान झाले आहे. भात उत्पादनाबरोबर शेतीच्या उत्पन्नातही घट येणार आहे. उसाचे उत्पादनही घटणार असून, भुईमुगाचे पिकाचे पन्नास टक्के उत्पादन घटले आहे.- सूर्यकांत दोरुगडे, प्रगतिशील शेतकरी, सोहाळे, ता. आजरा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.