Paddy Harvesting
Paddy Harvesting Agrowon

Paddy Harvesting : यंत्राद्वारे भातकापणीला वेग

Paddy Crop : भातकापणीसाठी लागणारा वेळ व मजुरांना द्यावा लागणारा मोबदला यांच्याशी तुलना करता अगदी किफायतशीर दर अन् कमी वेळात काम होत आहे.
Published on

Paddy Farming : मजुरीचे वाढलेले दर, महागलेली बियाणे, खते आणि भाताला मिळणारा कमी भाव यामुळे भातशेती करणे जिकिरीचे झाले आहे; मात्र यंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी यंत्राद्वारे भातरोपांची कापणी करत आहेत.

त्यामुळे पारंपारिक पद्धतीने कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तसेच भातकापणीसाठी लागणारा वेळ व मजुरांना द्यावा लागणारा मोबदला यांच्याशी तुलना करता अगदी किफायतशीर दर अन् कमी वेळात काम होत आहे. त्यामुळे भातकापणीच्या खर्चात आणि वेळेत बचत होत आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : डहाणूत भातपीक कापणीला वेग

शेतीत आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे सुपीक व मोठ्या आकाराच्या शेतजमिनीत कमी मेहनतीत पीक घेणे शक्य होत आहे. असे असले तरी आजही शहापूरच्या ग्रामीण भागांत मशागत, नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, झोडणी ही कामे पारंपरिक पद्धतीनेच केली जातात, परंतु अलीकडे नांगर दुर्मिळ झाला आहे, तसेच नांगर व नांगऱ्या यांची भरमसाठ मजुरी वाढली आहे.

मजुरांना जेवण, प्रवासखर्च व ५०० रुपये माणसी याप्रमाणे मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे; मात्र यावर्षी ग्रामीण भागात कापणी यंत्राने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत केली आहे.

Paddy Harvesting
Paddy Harvesting : डहाणूत भातपीक कापणीला वेग

दिवसभरात भाताचे १०० भारे कापायचे तर ४ ते ५ मजूर घ्यावे लागतात. त्यासाठी दिवसभरात तीन हजारांपर्यंत खर्च येतो, परंतु कापणीयंत्र ताशी १००० रुपये या दराने तासाभरात १०० भाऱ्यांची कापणी करतो. शिवाय कमी वेळात काम पूर्ण होत असल्याने दिवसेंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्यांचे कष्टही कमी होत आहेत.

कापणीयंत्राला परिसरात प्रचंड मागणी वाढली आहे. यंत्रमालक व शेतकरी दोघांनाही या यंत्राने फायदेशीर शेतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एका तासाला सव्वा लिटर डिझेल इंधन लागते. त्यामध्ये एक एकर शेती कापली जाते.
- राहूल जयराम मलीक, यंत्रमालक शेतकरी, वाचकोले (किन्हवली)
मजुरांची वानवा असल्याने कामे खोळंबून राहतात, पर्यायाने वेळेची व पैशाची बचत होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा.
- महेश पतंगराव, अध्यक्ष, शेतकरी सेवा सहकारी संस्था, किन्हवली विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com