Water Shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage In Satara : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात घट

Water Shortage Update : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कोयनेतून वीजनिर्मिती, शेतीसाठी व कर्नाटक राज्याला पाणी दिल्याने शिवसागर जलाशयाची पाणीपातळी घटली आहे.

Team Agrowon

Water Satara News : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कोयनेतून वीजनिर्मिती, शेतीसाठी व कर्नाटक राज्याला पाणी दिल्याने शिवसागर जलाशयाची पाणीपातळी घटली आहे. कोयना धरणात केवळ २३.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

इतर धरणांतही निम्म्यापेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सून लांबल्यास आगामी काळात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागेल.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पारा वर गेला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत.

जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरणांतील पाणीपातळी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. कोयनेत २३.३९, धोममध्ये ४१.४७, बलकवडीत २१.१०, कण्हेर २७.८८, उरमोडीत ४२.४५, तारळीत ५५.८०, तर येरळवाडीत १९.३३ टक्के पाणीसाठा आहे.

शिवसागर जलाशयातील पाणीपातळी नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. बामणोली, वानवली, तापोळा, सोळशी भागांतील नदीपात्र कोरडे पडले आहेत. कोयना नदीपत्राला ओढ्याचे स्वरूप आल्याने दैनंदिन रोजंदारीचा बोटिंग व्यवसायही अडचणीत आला आहे. सध्या तापोळा ते बामनुरी, भांबोली, बामणोली भागांत अल्प पाणीसाठा आहे. लॉन्च, स्पीड बोट, पेंडल बोट जिथे पाणी आहे तेथेच उपलब्ध आहेत.

दुर्गम भागात नागरिकांची पायपीट

दुर्गम भागातील लोकांचे हाल होत आहेत. पाणी नसल्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. दुष्काळी भागात पाणीटंचाई भासू नये, यासाठी कण्हेर, उरमोडी, तारळी धरणांतून पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागेल. सध्या दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लोकांना पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे.

धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (टीएमसी)

कोयना - २४.६२

धोम- ५.६०

धोम बलकवडी - ०.८६

कण्हेर - २.८२

उरमोडी - ४.२३

तारळी - ३.२५

येरळवाडी - ०.६००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT