Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : संपूर्ण नांदगाव तालुक्यालाच दुष्काळी म्हणून घोषित करा ; अनिल आहेर

Drought Update : ट्रिगर-२ मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून होणे आवश्यक होते, तशी परिस्थिती असूनही तालुक्याचा समावेश झालाच नाही.

Team Agrowon

Nashik News : ट्रिगर-२ मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून होणे आवश्यक होते, तशी परिस्थिती असूनही तालुक्याचा समावेश झालाच नाही. मंडळनिहाय उपयोजनेतूनही न्यायडोंगरी,भार्डी व बाणगाव या महसुली मंडळांना वगळण्यात आले.

हा जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार झाल्याने या मंडळांचा समावेश उपाययोजनेच्या आराखड्यात झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी माजी आमदार अॅड. अनिल आहेर यांनी शनिवारी (ता. १८) मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन केली.

मंत्री पाटील यांनी अॅड. आहेर यांच्या मागणीची दाखल घेत मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीबाबत निर्देश दिले. मंत्री पाटील यांच्या अमळनेर येथील निवासस्थानी आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत तालुक्यातील दुष्काळाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.

दुष्काळाच्या यादीपासून वंचित न्यायडोंगरी, बाणगाव, भार्डी या तिन्ही मंडळात दुष्काळी परिस्थिती असल्या कारणाने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा. केंद्र सरकारच्या धर्तीवर ट्रिगर-१ व ट्रिगर-२ च्या सर्व उपाययोजना लागू करण्यात याव्यात, शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात यावा.

पीक विम्याची रक्कम तत्काळ अदा करण्याबाबतचे आदेश विमा कंपनीला देण्यात यावेत, असा आग्रह मंत्री पाटील यांच्यासोबत चर्चेत अॅड. आहेर यांनी लावून धरला. शिष्टमंडळात माजी उपसभापती उदय पवार,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, उदय पाटील, कैलास गायकवाड, नवनाथ बोरसे आदीचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT