Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Death : अहिल्यानगर तालुक्यात पुरात २५० जनावरांचा मृत्यू

Ahilyanagar Flood : अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, सारोळा कासार, वाळकी, अकोळनेर व परिसरातील साधारण पंधरा गावांत २७ मे रोजी झालेल्या मुसळधार, जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Ahilyanagar News : तालुक्यातील २७ मे रोजी झालेल्या जोरदार पावसाने नदीला आलेल्या पुरात २६६ लहान आणि मोठी जनावरे, जवळपास १२०० शेळ्या-मेंढ्या व कोंबड्या, ४२ जनावरांचे गोठे वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

या भागात दोन जणांचा मृत्यू झालेला असून शासनाने ४८ लाख ७३ हजार रुपयांची भरपाई दिली आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील पावसामुळे झालेली सर्वाधिक हानी झाल्याचे जुन्या काळातील शेतकरी सांगतात.

अहिल्यानगर तालुक्यातील खडकी, सारोळा कासार, वाळकी, अकोळनेर व परिसरातील साधारण पंधरा गावांत २७ मे रोजी झालेल्या मुसळधार, जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले. वरील भागात झालेल्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या वालुंबा नदीला पूर आला. पुराचे पाणी घरात, जनावरांच्या गोठ्यात घुसले.

पुरात अकडलेल्या दहा लोकांना लष्कर, पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी वाचवले. मात्र मोठ्या प्रमाणात जनावरे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यासह जनावरांचे गोठे वाहून गेले. प्रशासनाकडून पंचनामे सुरू होते. तालुका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीननुसार, मोठी दुधाळ ५५ जनावरे, २०५ लहान दुधाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या, ५ बैल, १ लहान वासरू असे २६६, ४२ जनावरांचे गोठे, ११७० कोंबड्या, १९२ कच्ची घरे आणि ४२ जनावरांची गोठे वाहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुधाळ जनावरांना प्रत्येकी ३७ हजार, शेळ्या-मेढ्यांना प्रत्येकी ४ हजार, बैलासाठी ३२ हजार, वासरासाठी २० हजार, प्रती कोंबडी १०० रुपये, घर, घरासाठी ३ हजारानुसार नुकसान भरपाई दिली जात आहे.

अहिल्यानगर तालुक्यात नुकसानीपोटी गोठ्यासाठी या नुकसानीपोटी नैसर्गिक अपत्तीमधून जनावे, शेल्यामेंढ्या, घराचे, जनावरांच्या गोठ्याचे नुकसान मिळून ४० लाख ७३ हजार ५०९ रुपये व दोन मृत्यूप्रकरणी प्रत्येकी चार लाखांची भरपाई दिली आहे.

या भागातील गावांत रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ६१ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतिम अहवाल आल्यावर नुकसान स्पष्ट होणार आहे. प्राथमिक अहवालानुसार ३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे.

तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला. शहरात एका मुलीचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे आठ लाखांची आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT