Agriculture Solar Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Scheme : बाराशे कृषिपंपांना मिळणार दिवसा वीजपुरवठा

Agriculture Solar Pump : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊर्जानिर्मिती सुरू झाली असून उर्वरित ठिकाणी सौर प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

Team Agrowon

Nashik News : महावितरणच्या कृषिपंप ग्राहकांना अखंडित, शाश्वत व दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमधून नाशिक शहर विभाग-२ अंतर्गत असलेल्या देशवंडी प्रकल्पातून ४ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू झाली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी देशवंडी येथील प्रकल्पाला भेट देऊन त्याची पाहणी केली. या वेळी जिल्ह्यातील सर्व सौर प्रकल्प गतीने पूर्ण कण्याचे त्यांनी निर्देश दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत असून नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊर्जानिर्मिती सुरू झाली असून उर्वरित ठिकाणी सौर प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

नाशिक मंडळातील नाशिक शहर विभाग-२ मधील देशवंडी येथील प्रकल्पातील वीज निर्मितीला सुरुवात झाली असून या प्रकल्पातून वडझिरे, मोह व ब्राह्मणवाडे येथील सुमारे १,२०० कृषी पंपधारक ग्राहकांना नागरिकांना यांचा लाभ मिळणार असून दिवसा वीजपुरवठा देखील मिळणार आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यांनी प्रकल्पाची पाहणी केली व आढावा घेतला.

कार्यकारी संचालक पडळकर हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी नाशिक परिमंडळातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ग्राहक सेवा, तक्रारी, थकबाकी व वीजबिल वसुलीबाबत आढावा घेतला. कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व योग्य दृष्टिकोन ठेवून आपले काम करावे, ग्राहकांना तत्पर सेवा द्यावी तसेच मोठ्या क्षमतेचे रोहित्र त्वरित कार्यान्वित करावेत याबाबत पडळकर यांनी सूचना केल्या.

तसेच, सौरपंप व सौरघर योजनेत नाव नोंदविलेल्या ग्राहकांची प्रकरणे त्वरित निकाली काढण्याबाबत सूचना दिल्या. सर्व कर्मचाऱ्यांना दैनदिन काम विभागून देण्यासाठी नियोजन करावे, त्यामुळे ग्राहक सेवा आणि कार्याचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांना येणार नाही याबाबत योग्य व्यवस्थापन करण्याच्या देखील सूचना त्यांनी केल्या. ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक वीज युनिटची पूर्ण वसुली व्हायला हवी तरच ग्राहकांना अखंडित वीज पुरवू शकतो. त्यामुळे मार्चपर्यंत शून्य थकबाकी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीमध्ये विविध विषयांचा व योजनांचा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा त्यांनी घेतला. यात नवीन वीज जोडणी, पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ, वीज गळती, जीआयएस सर्वेक्षण, अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कॅपासिटर बँक या संदर्भात आढावा घेऊन उपस्थितांना सूचना केल्या. नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता रमेश पवार आणि जगदीश इंगळे, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पावसाची मध्यम ते दमदार हजेरी

Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

Darwin Theory: ‘डार्विन उत्क्रांती’ सिद्धांताच्या निमित्ताने...

Interview with Dr. Suhas Diwase: राज्यातील जमीन मोजणी जलद आणि पारदर्शक होणार

SCROLL FOR NEXT