Agriculture Electricity Bill agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : दिवसा वीजपुरवठा ठरतोय दिवास्वप्न

Agriculture Solar Scheme : सिंचनकामी दिवसा वीज मिळावी, याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात आली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : सिंचनकामी दिवसा वीज मिळावी, याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र याकरिता आवश्‍यक जागेचा तिढा कायम असल्याने या योजनेला जिल्ह्यात गती मिळू शकली नाही. परिणामी, दिवसा वीज हे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्नच ठरले आहे.

पारंपरिक ऊर्जा उपलब्धतेच्या मर्यादा आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शेतीला सिंचनकामी दिवसा वीज मिळावी, याकरिता अपारंपरिक ऊर्जेच्या उपलब्धतेचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

त्याकरिता जिल्ह्यात जवळपास ८८ उपकेंद्रे उभारण्यात येणार होती. परंतु महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ ३९ उपकेंद्रांकरिताच जागा उपलब्ध झाली आहे. २७ उपकेंद्रांसाठी जागाच उपलब्ध झाली नाही, तर २२ उपकेंद्रासाठीची जागा प्रकल्पाला पूरक नाही. त्यामुळे ही योजना गेल्या काही वर्षांत पुढेच सरकली नाही, अशी स्थिती आहे.

विशेष म्हणजे पडीक असलेल्या जमिनीवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतील. जिल्ह्यात जवळपास ३५६ मेगावॉट वीज निर्मिती करण्याचा उद्देश असून, यासाठी ८८ उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. सध्या शेतीला रात्री वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एक मेगावॉटसाठी हवी चार एकर जमीन

सौरऊर्जा प्रकल्पातून शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार एक मेगावॉट वीज निर्मितीकरिता सुमारे तीन ते चार एकर जमिनीची गरज राहते. जिल्ह्यात जवळपास ३६५ मेगावॉट ऊर्जा निर्मिती केली जाणार असून, यासाठी १७०० ते १८०० एकर जमीन ‘महावितरण’ला लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT