Maharashtra Cow Milk : राज्य सरकारकडून गायीच्या दुधासाठी अनुदान देण्याची घोषणा केली यानंतर सहकारी दूध संस्थाकडून इअर टॅगींग असलेल्या गायींची माहिती भरण्याचे काम युद्धा पातळीवर सुरू होते. परंतु काही कारणास्तव अनेक गायी यापासून वंचित राहिल्याने यांना अनुदान मिळणार का नाही याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान यावर आता सरकारने मुदतवाढ दिली आहे.
गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्चपर्यंत मुदत दिली होती. दरम्यान राज्य शासनाने मंगळवार (दि. ३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरण्याची तारीख पुन्हा वाढवून अंतिम तारीख देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ४७ हजार ८८२ शेतकऱ्यांना २० कोटी ३७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
गायीच्या दुधाच्या दरात घसरण झाल्याने राज्य शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेतला होता. ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीसाठीही अनुदान देण्यात आले आहे. यासाठी शासनाच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती.
पशुधन टॅगींग असणे बंधनकारक असल्याने अनेक दूध उत्पादकांची अडचण झाली होती. 'गोकुळ' दूध संघाने प्राधान्याने हे काम केल्याने त्यांच्या ३९ हजार शेतकऱ्यांना १४ कोटी ३६ लाख रुपये अनुदानाचा लाभ मिळाला आहे. त्या पाठोपाठ वारणा दूध संघाच्या ६९०२ शेतकऱ्यांना ३ कोटी ७० लाख रुपये अनुदान मिळाले.
अद्यापही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. माहिती नमुन्यात न भरल्याने त्यांची नावे पात्र ठरलेले नाहीत. या शेतकऱ्यांसाठी मंगळवारपर्यंत नव्याने दुधाची माहिती भरता येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना वेळेत दुधाची माहिती भरता आलेली नाही. त्यांना मुदतवाढ दिली असून, आपल्या दूध संघांच्या माध्यमातून ती भरून अनुदानाचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील दूध संस्थांनीही वंचित शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आवटे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.