Papaya Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसामुळे पपई पिकाचे नुकसान

Team Agrowon

Buldana News : गेले काही दिवस सातत्याने पाऊस झाल्याने खरीप पिकांसह फळबागांचेही नुकसान होत आहे. तालुक्यातील आवार येथे श्रीराम गावंडे यांच्या पपई बागेत प्रचंड नुकसान झाले असून, झाडे व त्यावर लागलेली फळे खराब झाली आहेत.

तालुक्यातील आवार येथील श्रीराम गावंडे यांनी यंदा पपईची लागवड केली होती. या भागात सतत पाऊस होत असल्याने बागेतील अनेक झाडे उलमळून पडली आहेत.

पारंपरिक पिकांना फाटा देत त्यांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला व फळबाग म्हणून पपईची लागवड केली. परंतु आता हे पीक निसर्गाच्या संकटामुळे हातातून निघून गेल्याने शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहले आहे.

त्यांचे जवळपास अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन एकरांतील पपईचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून सततचा पाऊस झाल्यामुळे हे नुकसान झाले.

तसेच खरीप पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणार नुकसान होत आहे. त्यामुळे बळीराजापुढे पुन्हा संकट निर्माण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Warna Sugar Factory : ‘वारणा कारखाना जतला सौरऊर्जा प्रकल्प उभारणार’

Nashik DCC Bank : पीककर्ज, सक्तीच्या वसुली विरोधात शेतकरी संतप्त

Salary of Kotwal : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ३८ लोककल्याणकारी निर्णय

Jowar Procurement : हमीभावाने ज्वारी खरेदीस आज शेवटची मुदत

SCROLL FOR NEXT