Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage in Dharashiv: धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी; अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान

Heavy Rain in Dharashiv: राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाड्यात ४ ते ५ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यात देखील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला. यात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातही अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर व परिसरात अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तर लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तालुक्यातील तेरमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शेतीसाठीच्या प्रचंड खर्चामुळे शेतकऱ्यांचा जीव आधीच मेटाकुटीला आलेला असताना आता हातातोंडाशी आलेली पिके देखील अतिवृष्टीमुळे हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता प्रपंच कसा चालवायचा? असा प्रश्न करत आहे.

सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव

उमरगा तालुक्यातील माडज परिसराला देखील अतिवृष्टीचा फटका बसला आहे. येथील सोयाबीन पिकांवर विविध प्रकाराच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर बहुतांश ठिकणी सोयाबीन पाण्याखाली गेल्याने येल्लो मोजाक रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत असून परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम देखील वाया जाईल अशी भीती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT