crop damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : ९९ हजार हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा, नाशिक, बुलढाण्यात सर्वाधित नुकसान

Heavy rain : दोन दिवसांपूर्वी अवकाळी आणि गारपीट झाल्याने राज्यातील ९९ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले.

Swapnil Shinde

Rainfall crop damage : मागील दोन दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीठ झाल्याने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अवकाळी व गारपीटीचा 17 जिल्ह्यांमध्ये फटका बसला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड, लालसगाव, चांदवड, मनमाड आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पावसाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तात्काळ सविस्तर पंचनामे करण्याच्या सूचना देऊन पीकविमाच्या निकषात बदल करण्याबाबत वरिष्ठपातळीवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासित केले.

कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ग्वाही दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT