Akola News : अकोला जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते २९ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला होता. या पावसाचे पाणी अनेक शेतांमध्ये साचले. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढले असून नुकसानीचा सुधारित प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला पाठवण्यात आला आहे.
त्यानुसार पावसाचा ८३२ गावांना फटका बसला असून ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. पावसामुळे कपाशीचे नुकसान झाले.
जिल्ह्यात त्याकाळात ५० मिलिमिटरपेक्षा जास्त नोंद झालेली आहे. पावसाआधीपासून शेतशिवारात कापूस वेचणीला आलेला होता. पाऊस झाल्याने हा कापूस ओला होत पिवळा पडला. तुरीच्या पिकाला आलेला बहर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गळून पडला. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात येत असून नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे.
पाऊस, वादळाचा गहू, हरभरा, भाजीपाला, तूर, कपाशी पिकाला फटका बसला. जिल्हा प्रशासनानुसार सुरुवातीला केवळ तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता.
परंतु आता इतर तालुक्यांतसुद्धा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळेच नुकसानीचे क्षेत्रफळसुद्धा वाढले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आली आहे. या नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.