Pune APMC
Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीत सेसचे दैनंदिन ऑनलाइन संकलन

Team Agrowon

पुणे : पुणे बाजार समितीमधील (Pune APMC) सेस चोरीचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी आणि सेस गळती रोखत उत्पन्न वाढविण्यासाठी दैनंदिन गाळ्यावरच ऑनलाइन सेस संकलन सुविधा बाजार समितीने सुरू केली आहे; मात्र या संकलनासाठी आडत्यांनी थंड प्रतिसाद दिला असून, आडत्यांनी दैनंदिन व्यवहारातील सेस रोज भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने सक्ती केली जाणार आहे. जे आडते दैनंदिन सेस भरणार नाहीत त्यांच्यावर भविष्यात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

याबाबतची माहिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. ते म्हणाले, की बाजार समितीमध्ये आडते वार्षिक उलाढालीवर मार्चअखेरला सेस भरत होते; मात्र गेल्यावर्षीपासून सेस भरण्याच्या विलंबावर १२ टक्के व्याजाची दंडात्मक कारवाई करत, महिन्याला सेस भरण्याचा नियम केला होता.

या दंडात्मक कारवाईमुळे बाजार समितीचे उत्पन्न सुमारे ६० लाख रुपयांनी वाढले. हेच सेसद्वारे यावर्षी २०२१-२२ मध्ये मिळालेले ५१ कोटींचे उत्पन्न यावर्षी ६० कोटींपर्यंत वाढविण्यासाठी दैनंदिन ऑनलाइन सेस भरण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी आडत्यांना ऑनलाइन लिंक देण्यात आली असून, तोलणारांच्या आवक नोंदीनुसार सेस आकारणी केली जाणार आहे. ऑनलाइन लिंकमुळे गाळ्यावर बसूनच काही सेंकंदामध्ये सेस भरणा होणार आहे.

बाजार समितीच्या गुलटेकडी या मुख्य आवारातील फळे, भाजीपाला, गूळ, भुुसार, फुलांचा बाजारासह मोशी उपबाजार येथे ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे विविध भरणा रकमा जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याचा वेळ वाचणार आहे. अचूक हिशेब व जलद व्यवहारासाठी समितीने गेट वे पेमेंटची प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गरड यांनी सांगितले.

बाजार समितीच्या पारंपरिक व्यवस्थेमध्ये आडते दरवर्षी मार्चअखेर दरम्यान वार्षिक उलाढालीवर सेस भरणा करत होते. यामध्ये सेस गळतीचे प्रकार होत होते. हे टाळण्यासाठी दैनंदिन व्यवहारांवर सेस भरण्यासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सेस भरण्याची व्यवस्था नुकतीच सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने दैनंदिन सेस भरण्याची सक्ती केली जाणार आहे. जे आडते भरणार नाहीत त्यांचे प्रबोधन करून, नंतर दंडात्मक कारवाई केली जाईल. येत्या दोन महिन्यांत यंत्रणेचा वापर शंभर टक्के होईल.

- मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती, पुणे.

ऑनलाइन दैनंदिन सेस संकलनाबाबत बाजार समिती प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. ऑनलाइन पैसे भरण्यासाठी सुविधा गाळ्यावरच उपलब्ध होणार आहे. हे चांगले आहे; मात्र अद्याप ही यंत्रणा वेगाने कार्यरत झालेली नाही. तसेच आम्ही पारंपरिक सेस संकलनासाठी दरवर्षी हिशेब पट्ट्या आणि बिले बाजार समितीला कशाप्रकारे सादर करायये याबाबत संभ्रमावस्था आहे. याबद्लचा संभ्रम दूर झाल्यास ऑनलाइन सेस भरण्याचे आम्ही स्वागत करतो.

- बापू भोसले, अध्यक्ष आडते असोसिएशन, पुणे बाजार समिती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT