D. Y. Patil Agri University Agrowon
ॲग्रो विशेष

D.Y Patil Agri University : डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचा ‘अल्बेडो फाउंडेशनशी करार

Agriculture Technology : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ व अल्बेडो फाउंडेशन, नाशिक यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ व अल्बेडो फाउंडेशन, नाशिक (Nashik) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. अल्बेडो फाउंडेशन ही संस्था, रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि सर्वेक्षणाच्या विविध पैलूंमध्ये अत्याधुनिक कार्यक्रम प्रदान करते.

सध्या मॅपिंग उद्योगात वापरल्या जाणाऱ्या नवीन मुक्त-स्रोत जीआयएस सॉफ्टवेअर (GIS Software) आणि साधनांनी सुसज्ज व परिपूर्ण प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे.

विद्यार्थी व प्राध्यापक प्रशिक्षण, अतिथी व्याख्यान, संशोधन तसेच प्रयोगशाळा विकास अशा विविध विषयासंबंधी हा सामंजस्य करार केला आहे. याचा विद्यार्थी तसेच प्राध्यापक वर्गाला निश्‍चितच फायदा होईल,’’ असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी व्यक्त केले.

(ॲग्रो विशेष)

कृषी अभियांत्रिकी’चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे (Jayant Ghatge) म्हणाले, ‘‘कृषी अभियांत्रिकी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक महिन्याचे व चार महिन्यांचे औद्योगिक प्रशिक्षण तसेच रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस या विषयामध्ये संशोधनासाठी नवीन संधी उपलब्ध होईल.’’

या वेळी फाउंडेशन नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत निकम, रजिस्टार डॉ. जयेंद्र खोत, डॉ. मंगल पाटील व डॉ. सारिका वांद्रे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition Compensation: प्रलंबित प्रकरणे दोन महिन्यांत निकाली

Dr Jaysingrao Pawar Passes Away: मराठेशाहीचा इतिहासकार हरपला, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Agriculture Advice: अडचणींना घाबरू नका, शेतीत सतत ज्ञानार्जन करा

Vegetable Farming: उभारले भाजीपाला शेतीचे स्मार्ट मॉडेल

Agri Business: मध, मोहफुलांचे लाडू अन् स्ट्रॉबेरी लागवड

SCROLL FOR NEXT