D Y Patil Agricultural University agrowon
ॲग्रो विशेष

D Y Patil Agricultural University : डी. वाय. पाटील कृषी विद्यापिठाला गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट

Verm compost Screening Machine : 'या शोधांतर्गत प्रमाणित केलेले हे यंत्र शेतकरी व उद्योजकांना सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

sandeep Shirguppe

D Y Patil Agricultural University Kolhapur : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागातील एम. टेक. कृषीचे विद्यार्थी अमोल गाताडे यांनी निर्माण केलेल्या गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून पेटंट प्राप्त झाले आहे.

डॉ. सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाताडे यांनी हे संशोधन केले. विद्यापीठाला मिळालेले हे पहिले पेटंट आहे.

कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन म्हणाले, 'या शोधांतर्गत प्रमाणित केलेले हे यंत्र शेतकरी व उद्योजकांना सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे यंत्र प्रोटोटाईप कार्यक्षम असून सेंद्रिय शेतीद्वारे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी लाभदायक ठरेल.'

या संशोधनामध्ये गाताडे यांच्यासह कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, प्राचार्य डॉ. सुहास पाटील, डॉ. रणजित पवार, असोसिएट डीन डॉ. जयंत घाटगे यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी गाताडे व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT