Hurricane Update Agrowon
ॲग्रो विशेष

Hurricane signal : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

Bay of Bengal : कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने बंगालच्या उपसागरामध्ये शनिवारपर्यंत (ता. २५) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Team Agrowon

Pune News : कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने बंगालच्या उपसागरामध्ये शनिवारपर्यंत (ता. २५) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालींमुळे दोन्ही समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बुधवारी (ता. २२) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. गुरुवारी (ता. २३) हे कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. शनिवारपर्यंत (ता. २५) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

उत्तरेकडे सरकणारी ही प्रणाली रविवारपर्यंत (ता. २५) बांगलादेश, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहे. किनाऱ्यावर पोहोचताच हे चक्रीवादळ तीव्र होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यातच अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे केरळच्या किनाऱ्यालगतच्या आग्नेय अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या दोन्ही प्रणालींमुळे मॉन्सूनच्या आगमनावर परिणाम होणार आहे.

मॉन्सूनची प्रगती शक्य

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २२) अंदमान -निकोबार बेट समूहाचा बहुतांशी भागात प्रगती केली आहे. तर अरबी समुद्रातून पुढे चाल करत श्रीलंकेचा जवळपास निम्मा भूभाग व्यापला आहे. प्रगतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत उर्वरित अंदमान बेटांसह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या दाखल होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT