Akhilesh Yadav  Agrowon
ॲग्रो विशेष

Election Result 2024 : उत्तर प्रदेशात धावली ‘सप’ची सायकल

Team Agrowon

New Delhi : राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात दीर्घकाळानंतर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची (सप) सायकल धावली आहे. भाजपच्या अनेक धुरंधर नेत्यांचा ‘सप’ उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ केला. उत्तर प्रदेशातील खराब कामगिरीबद्दल अर्थातच भाजपला विश्लेषण करावे लागणार आहे.

राम मंदिराची उभारणी, काशी कॉरिडॉर, राज्यातील उत्तम कायदा-सुव्यवस्था, योगींचे स्थिर सरकार अशा मुद्द्यांचा निवडणुकीत मोठा लाभ होण्याची आणि पैकीच्या पैकी जागा जिंकण्याची भाजपला आशा होती. तथापि ‘इंडिया’ आघाडीच्या कामगिरीपुढे भाजप फिका पडला. पूर्वांचल, मध्य आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह सर्व भागात सपने घवघवीत यश मिळवले.

मुस्लिम आणि यादव मते आपल्यासोबत राहतील, याची दक्षता घेतानाच गैर-यादव ओबीसी, दलित आणि इतर समाजाची मते घेण्यासाठी अखिलेश यांनी विशेष व्यूहरचना रचली होती. निवडणुकीत दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. मात्र जनमनाची नस ओळखण्यात सप-काँग्रेस आघाडीला यश आले. अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांबद्दल नाराजी होती. याचाही आपसूक लाभ सप-काँग्रेस आघाडीला मिळाला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘सप’ने ३७ जागा लढवत अवघ्या पाच जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला ६२ तर बसपला १० जागा मिळाल्या होत्या. यावेळी सपने ६२ जागा लढवत ३० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. उत्तर प्रदेश हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची समजूत अखिलेश यादव यांनी खोडून काढली आहे. ‘सप’च्या दमदार कामगिरीमुळेच भाजपला स्वबळावर २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नाही, हे वास्तव आहे.

मुस्लिम-यादवांचा पक्ष अशी ओळख असलेल्या ‘सप’ने मागील काही काळात मागास समाजाला स्वत:सोबत जोडण्याची धडपड चालवली आहे. या सूत्राला पीडीए (पिछडा, दलित आणि अल्पसंख्यांक) असे संबोधले जाते. या सूत्राचा अवलंब करीत ‘सप’ने नेत्रदीपक कामगिरी केली.

काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा

मागील काही लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फारशी कमाल करता आली नव्हती. मात्र यावेळी काँग्रेसने चमकदार यश प्राप्त केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत केवळ रायबरेलीमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील सात मतदारसंघात काँग्रेसचा विजय मिळवताना दिसत आहे. काँग्रेसच्या मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत भरीव वाढ झाली असून हे पक्षाच्या दृष्टीने सुचिन्ह मानले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT