Agriculture Day Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Day : कृषी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर प्रदर्शन

डॉ.शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील कृषी युवा मंचातर्फे महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधत कृषी विषयक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

टीम ॲग्रोवन

बारामती, जि.पुणे ः डॉ.शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील कृषी युवा मंचातर्फे (Krushi Yuva Manch) महाराष्ट्र कृषी दिनाचे (Maharashtra Agriculture Day) औचित्य साधत कृषी विषयक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार (Rajendra Pawar), सीईओ नीलेश नलावडे (Nilesh Nalawade) उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये अजिंक्य हंगे आणि अभिजित शिंदे हे प्रमुख पाहुणे होते.

यावेळी अजिंक्य हंगे यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती आणि उत्पादन विक्रीबाबात आपले अनुभव सांगितले. अभिजित शिंदे यांनी आयात आणि निर्यात याबद्दल माहिती दिली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रज्ञा खराडे हिने शेतीविषयक माहिती दिली.

सार्थक थोरवे, मेघना राहते यांनी चर्चात्मक सत्राद्वारे कृषी विषयक बातम्या सांगितल्या. विनीत सुसर, प्रथमेश खामकर या विद्यार्थ्यांनी नाटकाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. कृषी दिनानिमित्त पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट पोस्टर बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी सीईओ नीलेश नलावडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये संदीप गायकवाड, जया तिवारी, आशिष रासकर, सागर शिंदे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

Marigold Farming: तीन हंगामांत झेंडूचे हुशारीने नियोजन

Agriculture Success Story: कुक्कुटपालन पूरक नव्हे, झाला मुख्य व्यवसाय

Sugarcane Farmer Issues: कष्ट शेतकऱ्यांचे, नफा इतरांचा

India Sugar Crisis: आकडे आणि नामुष्की

SCROLL FOR NEXT